Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > काहीजण मीठलिंबू घालून नारळपाणी पितात, तसं करणं तब्येतीसाठी बरं की पोटाच्या आजारांना आमंत्रण

काहीजण मीठलिंबू घालून नारळपाणी पितात, तसं करणं तब्येतीसाठी बरं की पोटाच्या आजारांना आमंत्रण

Coconut Water with Lemon and Salt : नारळपाणी तसंच इतकं पौष्टिक असतं तर त्यात मीठ आणि लिंबाचा रसा का टाकावा? हे कॉम्बिनेशन फायदेशीर असतं का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 17:08 IST2026-05-14T15:07:28+5:302026-05-14T17:08:57+5:30

Coconut Water with Lemon and Salt : नारळपाणी तसंच इतकं पौष्टिक असतं तर त्यात मीठ आणि लिंबाचा रसा का टाकावा? हे कॉम्बिनेशन फायदेशीर असतं का?

Is drinking coconut water with lemon and salt beneficial or harmful? See expert advice | काहीजण मीठलिंबू घालून नारळपाणी पितात, तसं करणं तब्येतीसाठी बरं की पोटाच्या आजारांना आमंत्रण

काहीजण मीठलिंबू घालून नारळपाणी पितात, तसं करणं तब्येतीसाठी बरं की पोटाच्या आजारांना आमंत्रण

Coconut Water with Lemon and Salt: शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी आणि शरीराला पोषण देण्यासाठी उन्हाळ्यात नारळपाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. नारळपाणी हे या दिवसांमध्ये खूप फायदेशीर मानलं जातं. कारण हे एखाद्या इलेक्ट्रोलाइट ड्रिंकसारखं काम करतं. सामान्यपणे नारळपाणी तसंच काही मिक्स न करता प्यायलं जातं. पण काही लोक टेस्ट वाढवण्यासाठी त्यात थोडं आणि लिंबू घालतात. पण अनेकांना प्रश्न पडतो की, नारळपाणी तसंच इतकं पौष्टिक असतं तर त्यात मीठ आणि लिंबाचा रसा का टाकावा? हे कॉम्बिनेशन फायदेशीर असतं का? हे कॉम्बिनेशन खरंच फायदेशीर असतं की नुकसानकारक ठरतं तेच जाणून घेऊया.

News18 च्या एका रिपोर्टनुसार, नारळपाण्यात नॅचरल इलेक्ट्रोलाइट्ससारखे पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि सोडिअम असतं. हे तत्व शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढतं. जेव्हा यात लिंबाचा रस टाकला जातो तेव्हा व्हिटामिन सी चं प्रमाण वाढत. ज्यामुळे फ्रेश वाटतं आणि एनर्जी सुद्धा मिळते. हलकं मीठ घातल्याने नारळपाणी नॅचरल इलेक्ट्रोलाइट ड्रिंकसारखं काम करू लागतं. जास्त घाम येणे, उन्हात राहणे किंवा कमजोरी जाणवल्यावर याने शरीर लवकर रिफ्रेश होतं.

डायटिशिअननुसार, नारळपाण्यात लिंबू आणि मीठ टाकल्यास पचन चांगलं होण्यास मदत मिळते. बऱ्याच लोकांना नारळपाण्यात लिंबाचा रस टाकून प्यायल्यास पोट हलकं वाटतं आणि आतून थंडही वाटतं. वर्कआउट केल्यानंतर किंवा उन्हातून घरी आल्यावर हे प्यायल्याने शरीराला लगेच आराम मिळतो. हेच कारण आहे की, बरेच लोक याला उन्हाळ्यात हेल्दी ड्रिंक मानतात. पण नारळपाण्यात जास्त मीठ घालू नये. जास्त मिठाने शरीराचं नुकसान होऊ शकतं.

एक्सपर्ट सांगतात की, जर नारळपाण्यात जास्त मीठ घातलं तर शरीरात सोडिअमचं प्रमाण वाढू शकतं. ज्यामुळे हाय ब्लड प्रेशर असलेल्या रूग्णांचं नुकसान होऊ शकतं. तर जास्त प्रमाणात लिंबाचा रस घातल्याने अॅसिडिटी, पोटात जळजळ किंवा आंबट ढेकरीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे हे योग्य प्रमाणात पिणंच फायदेशीर ठरू शकतं. याने शरीर हायड्रेट ठेवण्यास, थकवा कमी करण्यास आणि लगेच एनर्जी मिळण्यास मदत मिळेल.  

Web Title : नारियल पानी में नींबू और नमक: फायदे या नुकसान? एक्सपर्ट की सलाह

Web Summary : नारियल पानी में नींबू और थोड़ा नमक मिलाने से हाइड्रेशन और ऊर्जा बढ़ती है। यह पाचन में मदद करता है और पसीने से खोए हुए इलेक्ट्रोलाइट्स को फिर से भर देता है, लेकिन रक्तचाप और अम्लता के साथ संभावित समस्याओं से बचने के लिए संयम महत्वपूर्ण है।

Web Title : Coconut water with lemon and salt: Benefits or harm? Expert advice.

Web Summary : Adding lemon and a pinch of salt to coconut water can boost hydration and energy. It aids digestion and replenishes electrolytes lost through sweat, but moderation is key to avoid potential issues with blood pressure and acidity.