Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > चपातीचं पीठ सैल झालं तर काय करायचं? ५ टिप्स-झटपट तोडगा आणि पोळ्याही होतील मऊ..

चपातीचं पीठ सैल झालं तर काय करायचं? ५ टिप्स-झटपट तोडगा आणि पोळ्याही होतील मऊ..

How To Make Perfect Roti At Home : पिठात जास्त पाणी पडलं तर घाबरण्याचं काहीही कारण नाही. काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही परफेक्ट  चपात्या करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 17:22 IST2026-05-19T17:09:02+5:302026-05-19T17:22:28+5:30

How To Make Perfect Roti At Home : पिठात जास्त पाणी पडलं तर घाबरण्याचं काहीही कारण नाही. काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही परफेक्ट  चपात्या करू शकता.

Follow This Simple Trick To Deal With Sticky Dough To Make Roti | चपातीचं पीठ सैल झालं तर काय करायचं? ५ टिप्स-झटपट तोडगा आणि पोळ्याही होतील मऊ..

चपातीचं पीठ सैल झालं तर काय करायचं? ५ टिप्स-झटपट तोडगा आणि पोळ्याही होतील मऊ..

चपाती किंवा पराठे करताना पिठात पाणी जास्त झालं तर पीठ मळायला खूपच त्रास होतो. पीठ जास्त घट्ट असेल तर चपात्या नीट होत नाहीत. परफेक्ट चपात्या करण्यासाठी जास्त घट्ट किंवा सैल मळू नये. पीठ मध्यम मळावं. अनेकदा पिठात जास्त पाणी पडतं आणि पीठ सैल होते. पिठात जास्त पाणी पडलं तर घाबरण्याचं काहीही कारण नाही. काही सोप्या टिप्स वापरून तुम्ही परफेक्ट  चपात्या करू शकता. (Follow This Simple Trick To Deal With Sticky Dough To Make Roti)

१) तेल किंवा दूध

चिकट पिठाच्या चपात्या लाटताना पोळपाटाला चिकटतात. हे टाळण्यासाठी हातावर थोडं तेल लावून घ्या किंवा दूध लावा आणि दोन्ही हातांनी पीठ व्यवस्थित मळून घ्या.  यामुळे पीठ हाताला चिकटणार नाही आणि चपात्या मऊसूत होतील. 

 २) फ्रिजमध्ये ठेवा

चिकट पीठ वापरण्याची ही सगळ्यात सोपी ट्रिक आहे. जास्त सैल पीठ झालं असेल तर फ्रिजमध्ये ठेवा. हे पीठ कोणत्याही एअरटाईट डब्यात बंद करून १५ ते २० मिनिटांसाठी फ्रिजमध्ये ठेवा. फ्रिजच्या गारव्याने  पिठातील ग्लुटेन व्यवस्थित सेट होईल आणि चिकटपणा कमी  होईल.  ज्यामुळे चपात्या सहज होतील.

३) कोरडं पीठ मिसळा

थोडं कोरडं पीठ मळलेल्या पिठात मिसळून हलक्या हातानं पुन्हा पीठ मळून घ्या. जास्त प्रमाणात कोरडं पीठ न घालता हवं तितकंच घाला अन्यथा चपात्या कडक होतील.

 ४) तुपाचा वापर

चिकट पिठात तुम्ही तूप घालू शकता. पीठ मळण्याचं भांडं स्वच्छ करून त्यात तूप घाला आणि व्यवस्थित पसरवून घ्या. नंतर पीठ हातांनी व्यवस्थित मळून घ्या.

५) बटर पेपर किंवा प्लास्टिक शीट

सैलसर किंवा चिकट पिठासाठी हा उपाय परिणामकारक ठरतो. यासाठी एक स्वच्छ प्लास्टिकची पिशवी घ्या आणि त्याला हलकं तूप किंवा सुकं पीठ लावा. मध्ये पिठाचा गोळा ठेवा नंतर हलक्या हातानं चपाती लाटून घ्या. यामुळे चपाती चिकटणार नाही आणि व्यवस्थित लाटून होईल. हे टाळण्यासाठी नेहमी पीठ मळताना एकदम सगळं पाणी न घालता हळूहळू अंदाज घेत पाणी घाला. ज्यामुळे पीठ परफेक्ट मळून होईल.

Web Title : चिपचिपा आटा ठीक करें: मुलायम रोटियों के लिए 5 आसान उपाय

Web Summary : रोटी के आटे में पानी ज़्यादा हो गया? चिंता न करें! तेल, फ्रिज, सूखा आटा, घी या प्लास्टिक शीट का उपयोग करके आसानी से नरम रोटियां बेलें। गूंधते समय धीरे-धीरे पानी मिलाने से यह समस्या नहीं होगी।

Web Title : Fixing Sticky Dough: 5 Easy Tips for Soft Rotis

Web Summary : Too much water in roti dough? Don't worry! Use oil, refrigerate, add dry flour, ghee, or plastic sheet to easily roll soft rotis. Adding water gradually while kneading prevents this.