ताक हे फक्त जेवणाची चव वाढवत नाही तर ते आरोग्यासाठी उत्तम वरदान आहे. आयुर्वेदात ताकाला अमृत म्हटलं गेलं आहे. उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होते आणि उष्णतेमुळे पचनसंस्था मंदावते तेव्हा ताक औषधासारखे काम करते. (Buttermilk nutrition facts) पण आपण सलग १४ दिवस म्हणजे २ आठवडे नियमितपणे ताक प्यायले तर शरीरात होणारे बदल थक्क करणारे असतात. (Benefits of drinking buttermilk in summer)
अनेकांना उन्हाळ्यात पचनाचा, पित्ताचा त्रास होतो. उन्हाळामुळे अंगाची लाहीलाही होते, सततच्या घामाच्या धारांमुळे शरीरातील पाणी कमी होते ज्यामुळे थकवा जाणवतो. (Best time to drink buttermilk) पण रोज ताक प्यायल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि पचनसंस्था पूर्णपणे रिसेट होते. हे पेय प्रोबायोटिक्सने समृद्ध असल्याने आतड्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते. रोज ताक प्यायल्याने आरोग्याला कसे फायदे होतात पाहूया.
उन्हाळ्यात गव्हाची चपाती खावी की नाचणीची भाकरी? कोणता पर्याय बेस्ट- पाहा ऋतूनुसार काय खावं?
1. ताकामध्ये व्हिटॅमिन बी-१२, कॅल्शियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात असते. सलग १४ दिवस ताक प्यायल्याने आतड्यांमध्ये गुड बॅक्टेरियांची वाढ होते. यामुळे अन्नपचन नीट होते आणि गॅस, अपचन किंवा बद्धकोष्ठतेच्या तक्रारी कायमच्या दूर होतात. आपल्याला जेवल्यानंतर पोटफुगीची त्रास होत असेल तर ताक प्यायला हवे.
2. उन्हाळ्यात शरीराचे तापमान वाढल्याने छातीत जळजळ आणि पित्ताचा त्रास होतो. ताक हे थंड असल्यामुळे आपल्या जठराग्नीला शांत करण्याचे काम करते. दोन आठवड्यात आपल्या शरीरातील उष्णता बाहेर पडते, ज्यामुळे डोळ्यांची जळजळ किंवा तळपायांची आग कमी होते.
3. ताकात पाणी आणि मीठ असल्याने ते शरीरातील इलेक्ट्रोलाईट्सचे प्रमाण संतुलित ठेवते. उन्हाळ्यात घामावाटे बाहेर पडणारे क्षार ताकामुळे पुन्हा भरुन निघतात. यामुळे आपल्याला दिवसभर उत्साही वाटते आणि वारंवार तहान लागण्याची समस्या कमी होते.
4. ताक प्यायल्यानंतर पोट भरलेले राहते, ज्यामुळे भूक लागत नाही. अवेळी लागणारी भूक आणि क्रेविंग देखील कमी होते. यात कॅलरीज कमी आणि पोषक तत्वे जास्त असतात. रोज ताक प्यायल्याने चयापचय क्रिया वेगाने होते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
5. जेव्हा आपले पोट आतून स्वच्छ असते, तेव्हा त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर दिसून येतो. ताकामुळे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडल्याने त्वचा चमकदार होते. आणि मुरुमांचे प्रमाण कमी होते. ताकातील प्रथिने केसांच्या आरोग्यासाठी उत्तम ठरतात. ताक पिण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे दुपारच्या जेवणासोबत. रात्री जेवल्यानंतर ताक पिणे टाळा. ताक नेहमी नैसर्गिक स्वरूपात किंवा मिठासोबत प्यावे, त्यात साखर घालणे टाळावे.
