सध्याच्या धावपळीत आणि बैठी जीवनशैलीत फिट राहणं हे सर्वात मोठं आव्हान बनलं आहे. वजन कमी करायचं म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर जिममधील तासनतास घाम गाळणं किंवा कडक डाएट करणं हे चित्र उभं राहतं. वाढत्या वजनामुळे अनेकजण त्रस्त आहेत.(Weight loss Tips) वजन कमी करण्यासाठी महागडा डाएट प्लान, जीम, योगा यांसारख्या गोष्टी करतात पण काही केल्या रिजल्ट मिळत नाही. कोणतंही महागडं सबस्क्रिप्शन न घेता केवळ 'चालणे' हा व्यायाम आपल्याला आरोग्याचे सर्व फायदे मिळवून देऊ शकतो.(Fitness idea) आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दिवसाला १० ते १५ हजार पावलं चालणे हे जिममधील तासाभराच्या वर्कआउटइतकेच प्रभावी ठरू शकते.
अनेकदा आपण उत्साहात चालण्याचे ठरवतो. पण दोन-चार दिवसांतच आळस येऊ लागतो. ज्यांना व्यायामाचा कंटाळा येतो. त्यांनी १५ हजार पावलं चालण्याचं योग्य नियोजन केलं आणि काही स्मार्ट ट्रि्क्स वापरल्या तर न थकता आणि कंटाळा न येता आपण चालू शकतो. रोज १० हजार पावलं चालल्याने स्ट्रोक आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासही मदत होते. पाहूया १० ते १५ हजार पावलं चालण्यासाठी सोप्या ट्रिक्स.(Natural weight loss transformation)
२ मिनिटांत तव्यावरचे काळे डाग- चिकटपणा कमी करण्याचा घरगुती उपाय- तवा दिसेल नवाकोरा
1. एकाच वेळी १५ हजार पावलं चालण्याचा विचार केला तर आपल्याला थकवा जाणवेल. त्यासाठी चालण्याची पद्धत बदला. सकाळी ३ हजार, दुपारी जेवणानंतर २ हजार, संध्याकाळी ५ हजार आणि रात्रीच्या जेवणानंतर उरलेली पावलं चाला. या पद्धतीने विभाजन करुन पावलं चालल्यास आपल्याला थकवा जाणवणार नाही.
2. आपण फोनवर बोलत असू तर या वेळेचा उपयोग चालण्यासाठी वापरा. फोन आला की एका जागी न बसता फिरण्यास सुरुवात करा. ऑफिसचे कॉल्स असोत किंवा मित्रांशी गप्पा, फोनवर बोलता बोलता सहज २ ते ३ हजार पावलं आपण पूर्ण करु शकतो.
3. पाणी पिण्यासाठी स्वत: उठा किंवा इतर कोणत्या गोष्टी करण्यासाठी स्वत:उठ बस करा. कुठे जवळ जाऊन सामान आणायचे असेल तर गाडीने न जाता पायी चालत जा. ऑफिसमध्ये लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करा. या छोट्या गोष्टींमुळे आपल्या स्टेप्स काउंटमध्ये मोठी भर पडेल.
4. आयुर्वेदानुसार शतपावली करण्याला महत्त्व आहे. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर किमान १० ते १५ मिनिटं हळू चालल्याने पचनक्रिया सुधारते आणि रक्तातील साखर नियंत्रित राहते. हे फक्त चालणे नसून शरीरासाठी डिटॉक्स आहे.
5. आपल्या चालण्याचा कंटाळा येत असेल तर आपल्या आवडीचे गाणे किंवा पॉडकास्ट ऐका. यामुळे आपलं लक्ष वेळेपेक्षा माहितीकडे आणि गाण्याकडे असेल, ज्यामुळे आपण न थकता अंतर सहज कापू शकतो.
6. नियमित चालण्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. चालताना शरीरात एंडोर्फिन नावाचे आनंदी संप्रेरक तयार होतात. ज्यामुळे तणाव आणि स्ट्रेस कमी होतो. १५ हजार पावलं चालल्याने शरीरातील अतिरिक्त कॅलरीज जळतात, ज्यामुळे नैसर्गिकरित्या वजन कमी होण्यास मदत होते. चालणे हा एक वेट-बेअरिंग व्यायाम असल्याने हाडांची घनता वाढते आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो.
