साधारण तिशी- पस्तिशी ओलांडल्यानंतर बऱ्याच जणांना असा अनुभव येतो की चालताना त्यांचे तळपाय दुखतात. किंवा खूप वेळ एका जागी बसून आपण जेव्हा उभे राहतो तेव्हा तळपायांना त्रास होतो. काही पावलं लंगडतच चालावी लागतात आणि त्यानंतर कुठे व्यवस्थित चालता येतं. कारण पायांची बोटं, बोटांच्या आसपासचा भाग, पायाचा घोटा असं सगळंच दुखत असतं. असा त्रास तुम्हालाही होत असेल तर सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर अंशुका परवानी यांनी काही व्यायाम सांगितले आहेत (How to Get Relief From Foot Pain?). ते नियमितपणे काही दिवस करून पाहा. नक्कीच बराच आराम वाटेल.(exercise to reduce feet pain by Anshuka Parvani)
तळपाय दुखत असतील तर कोणते व्यायाम करावेत?
याविषयी माहिती सांगणारा एक व्हिडिओ अंशुका परवानी यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेले व्यायाम करण्यासाठी एका खुर्चीवर बसा. दोन्ही तळपाय जमिनीवर टेकलेले असू द्या.
उन्हाळ्यात आईस्क्रिम खावंसं वाटतं; पण दात ठणकतात? ५ उपाय करा- बिंधास्त आईस्क्रिम खा
त्यानंतर एक पाय दुमडून त्याचा तळपाय दुसऱ्या पायाच्या गुडघ्यावर ठेवा. यानंतर तळपाय हातात पकडून क्लॉकवाईज आणि ॲण्टीक्लॉकवाईज दिशेने प्रत्येकी ५- ५ वेळा गोलाकार फिरवा.
दुसरा व्यायाम करण्यासाठी हाताने दाब देऊन तळपाय खालच्या दिशेने आणि वरच्या दिशेने असा प्रत्येकी ५- ५ वेळेस दाबा. यामुळे पायांच्या नसा मोकळ्या होऊन आराम वाटेल.
पुढे सांगितलेले काही व्यायामही करून बघा
१. पायाच्या टाचा उचलून फक्त बोटांवर जोर देऊन २ ते ३ मिनिटे घरातल्या घरात चाला.
२. त्यानंतर पायाची बोटं उचलून घ्या आणि बोटं जमिनीवर न टेकवता टाचांवर जोर देऊन २ ते ३ मिनिटे चाला.
एखादं गाणं ऐकल्यावर का आपण दिवसभर तेच गुणगुणतो? बघा आपल्या डोक्यात कोणता किडा वळवळत असतो...
या व्यायामांसोबतच तुम्ही घालत आहात ती चप्पल योग्य आहे का हे देखील एकदा तपासून पाहा. कारण चुकीची चप्पल, सॅण्डल किंवा बूट घातल्यामुळेही तळपाय खूप दुखतात.
