Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > एखादं गाणं ऐकल्यावर का आपण दिवसभर तेच गुणगुणतो? बघा आपल्या डोक्यात कोणता किडा वळवळत असतो...

एखादं गाणं ऐकल्यावर का आपण दिवसभर तेच गुणगुणतो? बघा आपल्या डोक्यात कोणता किडा वळवळत असतो...

Why do Some Song Get Stuck in Head?: तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का बघा त्यामागे नेमकं काय कारण असतं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2026 09:40 IST2026-04-30T09:39:17+5:302026-04-30T09:40:01+5:30

Why do Some Song Get Stuck in Head?: तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का बघा त्यामागे नेमकं काय कारण असतं...

why do some song get stuck in head? | एखादं गाणं ऐकल्यावर का आपण दिवसभर तेच गुणगुणतो? बघा आपल्या डोक्यात कोणता किडा वळवळत असतो...

एखादं गाणं ऐकल्यावर का आपण दिवसभर तेच गुणगुणतो? बघा आपल्या डोक्यात कोणता किडा वळवळत असतो...

बऱ्याचदा असं होतं की सकाळच्या वेळी आपण आपल्या गडबडीत असतो. पण तरीही आपल्या कानावर कुठूनतरी एखादं गाणं पडतं. मग ते गाणं कधी आपल्याच घरात लावलेलं असतं तर कधी शेजारच्या घरातून ते आपल्या कानावर येतं. कधी असं ही होतं की आपण रस्त्याने जात असतो आणि बाजुने जाणाऱ्या रिक्षात ते गाणं वाजत  असतं.. कधी ती एखाद्या मोबाईलची रिंगटोनही असते. असं कुठून ना कुठून ते गाणं आपल्या कानांवर पडतं आणि त्यातल्या काही ओळी आपल्या डोक्यात अगदी फिक्स होऊन जातात. येता जाता आपण ते गाणं गुणगुणत राहातो.. आपला अख्खा दिवस त्यातच निघून जातो. असा अनुभव तुम्हालाही आला आहे का? बघा असं नेमकं का होतं?(Why do Some Song Get Stuck in Head?)

आपण एकच एक गाणं दिवसभर का गुणगुणत बसतो?

 

वैज्ञानिक भाषेत सांगायचं झालं तर या अवस्थेला इअरवॉर्म Earworm असं म्हणतात. म्हणजेच कानातला किडा. गंमत म्हणजे आपण तर पूर्ण गाणं किंवा त्या गाण्याचं एखादं कडवं ऐकलेलं असतं. पण तरीही त्यातल्या मोजक्या २ ते ३ ओळी आपण सतत गुणगुणत राहातो.

लिंबाचा रस काढून साल फेकू नका, करा गोड आंबट लोणचं- घ्या अगदी सोपी पौष्टिक रेसिपी

यालाच इअरवॉर्म म्हणतात. साधारणपणे आपण अशीच धून गुणगुणतो जी म्हणायला सहज सोपी असते आणि तिला एक विशिष्ट लय असते. आपला मेंदू एखाद्या ऑपरेटिंग सिस्टिमसारखं काम करत असतो. यातल्या एका भागाला फोनोलॉजिकल लूप म्हणतात. हा लूप आपल्या आठवणी आणि भावभावनांशी जोडलेला असतो. त्यामुळे एखादं गाणं ऐकून भुतकाळातले काही खास प्रसंग आठवतात तर काही ठिकाणी गेल्यावर आपोआप काही गाणी डोक्यात सुरू होतात.

 

अभ्यासक असंही सांगतात की जेव्हा आपल्यााला खूप ताण असतो किंवा आपलं डोकं अगदी रिकामं असतं,

उन्हाळ्यात आईस्क्रिम खावंसं वाटतं; पण दात ठणकतात? ५ उपाय करा- बिंधास्त आईस्क्रिम खा

तेव्हा आपला मेंदू आपोआप ऐकू येणारी एखादी लय हेरतो आणि मग तेच ते आपल्या डोक्यात सतत वाजू लागतं. तेच आपण गुणगुणू लागतो. ज्यांना संगीताची आवड असते किंवा ज्यांना ऑब्सेसिव्ह कंम्पसिव्ह डिसऑर्डर हा आजार असतो त्यांना तर हा अनुभव जास्त येतो.. 

 

Web Title : गाने दिन भर हमारे दिमाग में क्यों अटके रहते हैं?

Web Summary : कभी सोचा है कि कोई गाना आपके दिमाग में क्यों बजता रहता है? इसे 'इयरवॉर्म' कहते हैं। लय के साथ आसान धुनें, यादों से जुड़ी होती हैं, तनाव या खाली समय में अटक जाती हैं, खासकर संगीत प्रेमियों और ओसीडी वाले लोगों के लिए।

Web Title : Why Do Songs Get Stuck in Our Heads All Day?

Web Summary : Ever wondered why a song replays in your head? It's called 'Earworm.' Easy melodies with rhythm, linked to memories, get stuck when stressed or idle, especially for music lovers and those with OCD.