हल्ली ऐन तिशीतच कित्येकांचं बॉडी पोश्चर बिघडलेलं आपण पाहातो. एवढंच नाही तर बऱ्याचदा दप्तराच्या ओझ्यामुळे शाळकरी मुलंही खांदे झुकवून, पाठ वाकवून चालतात. शिवाय बसण्याची, चालण्याची, उभं राहण्याची चुकीची पद्धत याचाही परिणाम बॉडी पोश्चरवर होतोच. लॅपटॉपवर काम करताना कित्येक जाण तासनतास चुकीच्या पद्धतीने बसतात. त्याचाही परिणाम होतो आणि कमी वयातच पाठ वाकलेली दिसू लागते. बॉडी पोश्चर बिघडल्यामुळे समोरच्यावर आपली नकारात्मक छाप तर पडतेच, पण त्यातून पाठ, कंबर दुखण्याच्या वेगवेगळ्या तक्रारीही डोकं वर काढू लागतात. म्हणूनच बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी पुढे सांगिलेले काही व्यायाम नियमितपणे करून पाहा.(simple exercises for improving bad posture, hunchback and rounded shoulders)
बॉडी पोश्चर सुधारण्यासाठी साधे सोपे व्यायाम
हे व्यायाम अतिशय सोपे असून त्यासाठी खूप वेळ काढण्याचीही गरज नाही. अगदी एकेका मिनिटाचे हे व्यायाम असून तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे करू शकता.
तिशी आली? आवडत नसले तरी 'हे' पदार्थ खायला सुरुवात करा, भविष्यातला दवाखान्याचा खर्च वाचेल
पहिला व्यायाम म्हणजे ताठ उभे राहा किंवा बसा. यानंतर दोन्ही हात वर करा. उजवा हात डोक्यावरून घेत उजवा तळहात डाव्या कानाला लावा. तसंच डाव्या हाताने करा. डाव्या तळहाताने उजवा कान झाका. या अवस्थेत १ मिनिट थांबा.
ताठ उभे राहा. दोन्ही हात मागे घ्या आणि तळहात एकमेकांमध्ये गुंफा. यानंतर हात वरच्या बाजुने ओढण्याचा प्रयत्न करा आणि मान वर करून छताकडे पाहा. या अवस्थेत १ मिनिट थांबावे. खांदे सरळ होण्यास मदत होईल.
गूळ- खोबऱ्याचा 'हा' पदार्थ आहे आलिया भटचं ब्यूटी सिक्रेट, पाहा तुमच्या घरातही तो नक्कीच सापडेल
दोन्ही हात मागच्या बाजुने पाठीवर घ्या आणि तळहात एकमेकांना जोडा. हा व्यायाम रोज १ मिनिटासाठी केला तरी पाठीचा कणा बराच ताठ होईल.
एक थोडंसं जाडसर पुस्तक घ्या आणि ते डोक्यावर ठेवा. अशा पद्धतीने घरातल्या घरात एखादा मिनिट चाला. हळूहळू वेळ वाढवत न्या. मान सरळ होईल.
