सुंदर दिसणं म्हणजे काय ? भरपूर मेकअप? महागडे कपडे , उठून दिसणारे प्रॉडक्ट्स बास एवढंच असतं का? आत्मविश्वास , सुंदरता , व्यक्तिमत्व या संकल्पना चुकीच्या मार्गाने आपल्यापर्यंत पोहचतात. सोशल मिडियाचा आपल्या आयुष्यावर असलेला प्रभावी सौंदर्याच्या व्याख्या बदलतो. या सगळ्या दिखाव्याच्या गोष्टी न करताही सुंदर दिसता येते. लक्षात ठेवा या १० गोष्टी.
१. सतत स्वत:ची तुलना इतरांशी केल्याने आत्मविश्वास कमी होतो. प्रत्येक व्यक्ती वेगळी आणि सुंदर असते. स्वतःच्या गुणांकडे लक्ष द्या. जेव्हा तुम्ही स्वतःला स्वीकारता, तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसू लागते.
२. महागडे कपडे नसले तरी स्वच्छ, इस्त्री केलेले आणि व्यवस्थित कपडे तुमचं व्यक्तिमत्त्व उठावदार बनवतात. स्वच्छ केस, नीट कापलेली नखं आणि फ्रेश लूक हे सौंदर्याचं खऱ्या अर्थाने गुपित आहे. त्यामुळे प्रेझेंटेबल राहा , त्यासाठी जास्त खर्च करायची गरजच नसते.
३. नेहमी नाराज किंवा तणावग्रस्त चेहरा व्यक्तिमत्त्वावर परिणाम करतो. हलकंसं स्मितही तुम्हाला आकर्षक बनवतं. आनंदी व्यक्तींकडे लोक आपोआप आकर्षित होतात. चेहरा आनंदी ठेवा. कपाळावर आठ्या नकोत.
४. पुरेशी झोप, पाणी आणि पौष्टिक आहार याचा थेट परिणाम त्वचेवर आणि ऊर्जा पातळीवर दिसतो. सतत थकलेला चेहरा लपवण्यासाठी मेकअप लावण्याऐवजी, निरोगी शरीर नैसर्गिक तेज देतं हे लक्षात घेऊन आरोग्याकडे लक्ष द्या.
५. फक्त चेहरा सुंदर असून उपयोग नाही, बोलण्यात आत्मविश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे. स्पष्ट बोलणं, डोळ्यात डोळे घालून संवाद साधणं आणि स्वतःचं मत मांडणं यामुळे व्यक्तिमत्त्व अधिक प्रभावी बनवतं. याला महत्व जास्त आहे.
६. खोली, बॅग, कपाट किंवा कामाची जागा व्यवस्थित ठेवा. घर स्वच्छ ठेवा. नीटनेटकेपणा हा व्यक्तिमत्त्वाचा भाग असतो आणि तो इतरांवर चांगली छाप पाडतो.
७. दिवसभर इतरांसाठी धावपळ करताना स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. थोडा आराम, आवडतं संगीत, पुस्तक किंवा चालणं यामुळे मन शांत राहतं आणि चेहऱ्यावर ताजेपणा दिसतो.
८. फॅशन म्हणजे फक्त ट्रेंड नाही. तुमच्यावर शोभतील असे रंग, साधे पण आरामदायक कपडे आणि स्वच्छ लूक हेच तुमचं व्यक्तिमत्त्व खुलवतात. स्वतःला कशात कम्फर्टेबल वाटतं हे ओळखा. सोशल मिडियावर काय सुरु आहे त्यापेक्षा काय आरामदायी आहे जास्त महत्वाचं.
९. मनात सतत नकारात्मकता असेल तर त्याचा परिणाम चेहऱ्यावर दिसतो. सकारात्मक विचार, कृतज्ञता आणि आनंदी स्वभाव तुमच्या व्यक्तिमत्त्वाला नैसर्गिक सुंदरता देतात. त्यामुळे कॅरेक्टर बिल्डींगकडे जास्त लक्ष द्या.
१०. तुमची ओळख फक्त दिसण्यावर ठरत नाही. तुमचं मन, विचार, मेहनत आणि स्वभावही महत्त्वाचा असतो. जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखता, तेव्हा इतरांनाही तुमचं महत्त्व जाणवतं. त्यामुळे कशाला किती महत्व द्यावं हे जाणून घ्या. खरं सौंदर्य हे आत्मविश्वासात, स्वतःला स्वीकारण्यात आणि आनंदी राहण्यात असतं. मे
