Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Beauty > पाय होतील मऊ-मुलायम ते ही पेडीक्यूअर न करता , गरम पाण्यात मिसळा 'हे' पदार्थ आणि पाहा जादू ...

पाय होतील मऊ-मुलायम ते ही पेडीक्यूअर न करता , गरम पाण्यात मिसळा 'हे' पदार्थ आणि पाहा जादू ...

Feet will become soft and smooth without pedicure, home remedies : पायाची काळजी घ्या या पद्धतीने. राहतील छान मऊ - मुलायम.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2026 17:33 IST2026-05-13T17:30:56+5:302026-05-13T17:33:01+5:30

Feet will become soft and smooth without pedicure, home remedies : पायाची काळजी घ्या या पद्धतीने. राहतील छान मऊ - मुलायम.

Feet will become soft and smooth without pedicure, home remedies | पाय होतील मऊ-मुलायम ते ही पेडीक्यूअर न करता , गरम पाण्यात मिसळा 'हे' पदार्थ आणि पाहा जादू ...

पाय होतील मऊ-मुलायम ते ही पेडीक्यूअर न करता , गरम पाण्यात मिसळा 'हे' पदार्थ आणि पाहा जादू ...

दिवसभर चालणे, धावपळ, धूळ, घाम आणि सतत चपल किंवा शूज घातल्यामुळे पायांची त्वचा काळी पडणे, टाचेला चिरा पडणे किंवा पाय खडबडीत होणे ही समस्या खूप सामान्य झाली आहे. (Feet will become soft and smooth without pedicure, home remedies )अनेक जण पाय सुंदर आणि स्वच्छ दिसावेत म्हणून महागडे पेडीक्युअर करतात, पण घरच्या घरीही काही सोप्या उपायांनी पायांची चांगली काळजी घेता येते. विशेष म्हणजे गरम पाण्यात पाय बुडवण्याची योग्य पद्धत वापरली तर पाय मऊ, स्वच्छ आणि फ्रेश दिसू शकतात.

पाय साफ करण्यासाठी सर्वात आधी एका टबमध्ये कोमट पाणी घ्यावे. पाणी खूप गरम नसावे, कारण त्यामुळे त्वचा कोरडी पडू शकते. या पाण्यात थोडं सैंधव मीठ, लिंबाचा रस आणि थोडासा शाम्पू किंवा लिक्विड साबण मिसळावा. काही लोक या पाण्यात गुलाबपाणी किंवा बेकिंग सोडाही घालतात. त्यानंतर पाय साधारण १५ ते २० मिनिटे त्या पाण्यात बुडवून ठेवावेत. त्यामुळे पायांवरील मृत त्वचा मऊ होण्यास मदत होते आणि घाणही सहज निघते.

पाय पाण्यातून बाहेर काढल्यानंतर हलक्या हाताने स्क्रब करावे. यासाठी बाजारातील स्क्रब वापरू शकता किंवा घरगुती उपाय म्हणून तांदळाचे पीठ, कॉफी आणि मध यांचे मिश्रणही वापरता येते. टाचांच्या भागावर विशेष लक्ष द्यावे, कारण तिथे त्वचा जास्त कोरडी आणि जाड झालेली असते. त्यानंतर स्वच्छ पाण्याने पाय धुऊन मऊ टॉवेलने पुसावेत.

पाय स्वच्छ केल्यानंतर मॉइश्चराइझर किंवा खोबरेल तेल लावणे खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे त्वचा मऊ राहते आणि टाचा फुटण्याचा त्रास कमी होतो. रात्री झोपण्यापूर्वी पायांना क्रीम लावून सॉक्स घातल्यास अधिक फायदा होऊ शकतो.
अनेक लोक पायांची काळजी फक्त पेडीक्युअरच्या वेळी घेतात, पण नियमित स्वच्छता अधिक महत्त्वाची असते. सतत घाण साचणे, घाम येणे किंवा त्वचा कोरडी पडणे यामुळे पायांची त्वचा खराब दिसू लागते. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी गरम पाण्यात पाय बुडवून साफ केल्यास पाय स्वच्छ राहण्यास मदत होते.

घरच्या घरी केलेली ही साधी काळजी केवळ पैसे वाचवत नाही, तर पायांना आरामही देते. नियमित काळजी घेतली तर पाय मऊ, स्वच्छ आणि सुंदर दिसू शकतात आणि वारंवार पार्लरमध्ये जाण्याची गरजही कमी होते.

Web Title : घर पर मुलायम पैर: बिना पेडीक्योर के लिए आसान उपाय

Web Summary : नमक, नींबू और शैम्पू के साथ गर्म पानी में पैर भिगोकर मुलायम, साफ पैर पाएं। स्क्रब से एक्सफोलिएट करें, मॉइस्चराइज़ करें और स्वस्थ, सुंदर पैरों के लिए नियमित रूप से देखभाल करें। एक सरल, किफायती सौंदर्य उपाय।

Web Title : Soft Feet at Home: Simple Soak for Pedicure-Free Smoothness

Web Summary : Get soft, clean feet without pedicures by soaking them in warm water with salt, lemon, and shampoo. Exfoliate with a scrub, moisturize, and maintain regular foot care for healthy, beautiful feet. A simple, cost-effective beauty regime.