Violation of Kovid-19 rules in Thane: Action against double-seat two-wheelers: 67 two-wheelers seized | ठाण्यात कोविड-१९ नियमांचे उल्लंघन: डबल सीट जाणाऱ्या दुचाकीस्वारांवर कारवाई: ६७ दुचाकी जप्त

अनलॉकच्या पहिल्याच दिवशी कारवाईचा बडगा

लोकमत रेटिंग्स

ठळक मुद्दे अनलॉकच्या पहिल्याच दिवशी कारवाईचा बडगाणेनगर वाहतूक शाखेचा दुचाकीस्वारांना दणका

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : राज्य शासनाने ‘लॉकडाऊन’ आता बंद केल्यानंतर अनलॉकच्या दिशेने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. मात्र, नियंमांचे सर्रास उल्लंघन करीत डबलसीट जाणा-या ६७ दुचाकीस्वारांवर वाहतूक नियंत्रण शाखेच्या ठाणेनगर युनिटने शुक्रवारी कारवाईचा बडगा उगारला. या सर्व ६७ दुचाकी जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्य शासनाने दुचाकीवरुन प्रवास करणाºया चालकालाच परवानगी दिली आहे. लॉकडाऊनचे नियम काही अंशी शिथिल करतांना ५ जून पासून अत्यावश्यक सेवांसाठी टॅक्सीमध्ये चालक अधिक दोन प्रवासी, रिक्षामध्ये चालकासह दोघे तर चार चाकी वाहनामध्येही चालकासह दोन प्रवाशांना परवानगी दिली आहे. तर दुचाकीवर केवळ चालकालाच परवानगी आहे. असे असूनही ठाण्यात शुक्रवारी पहिल्याच दिवशी बाजारपेठेत अनेकांनी दुचाकीवर डबल सीट प्रवास केल्याचे चित्र सकाळी ९ ते दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास पहायला मिळाले. ही माहिती मिळताच ठाणेनगर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड आणि पोलीस उपनिरीक्षक वाल्मीक सदगीर यांच्या पथकाने कोविड-१९ च्या अनुषंगाने राज्य शासनाने काढलेल्या आदेशाचे भंग केल्याप्रकरणी मोटार वाहन अधिनियम १७९ नुसार ६७ दुचाकीस्वारांवर कारवाई करीत कलम २०७ नुसार त्यांची वाहने जप्त केली. यात ४० चालकांना नोटीस बजावण्यात आल्या असून अनेकांवर ५०० रुपये प्रमाणे दंडात्मक कारवाई देखिल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. टॉवर नाका, जांभळी नाका आणि ठाणे रेल्वे स्थानक परिसरात ही कारवाई करण्यात आली. यापुढेही ही कारवाई केली जाणार असल्यामुळे कोणीही नियमांचे उल्लंघन करु नये असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.

Web Title: Violation of Kovid-19 rules in Thane: Action against double-seat two-wheelers: 67 two-wheelers seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.