Ajit Pawar | अजित पवारांकडून जीवाला धोका; पुण्यातील भाजप कार्यकर्त्याची पोलिसात धाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 12:47 IST2023-04-12T12:45:47+5:302023-04-12T12:47:04+5:30
प्लॉटचा ताबा साळगावकर यांच्याकडे असल्याने त्यांना सतत धमकी येत असल्याचे सांगण्यात आले...

Ajit Pawar | अजित पवारांकडून जीवाला धोका; पुण्यातील भाजप कार्यकर्त्याची पोलिसात धाव
पुणे : पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्याने विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. भाजपचे शिवाजीनगर मतदार संघाचे अध्यक्ष रवींद्र साळगावकर (Ravindra salgaonkar) यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अजित पवार यांच्याकडून जीवाला धोका असल्याचा तक्रारीत उल्लेख आहे. गणेश खिंड परिसरातील मोकळ्या प्लॉट संदर्भात मोजणी न करण्याचे न्यायालयाचे आदेश असतानाही मोजणी केली जात होती. सदर प्लॉटचा ताबा साळगावकर यांच्याकडे असल्याने त्यांना सतत धमकी येत असल्याचे सांगण्यात आले.
याबाबत पुणे शहर तहसील कार्यालयातही या प्लॉटच्या संदर्भात अजित पवार यांच्या नावाची चिठ्ठी लावली होती. तरीही तहसील कार्यालयातून साळगावकर यांना उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत. याच प्रकरणासंदर्भात साळगावकर यांनी अजित पवार यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. याबाबत पोलिसांनी अर्ज स्वीकारला असून तपास सुरू करण्यात आला आहे.
अजित पवारांचा संबंध नसेल तर त्यांच्या नावाची चिठ्ठी फाईलवर का लावण्यात आली? अजित पवारांच्या नावाचा गैरवापर केला का याचा तपास व्हावा अशी मागणी साळगावकर यांनी केली आहे.