'या' कारणासाठी लक्ष्मी आणि सोनाली आंदेकर कारागृहातून पुन्हा बाहेर येणार  

By किरण शिंदे | Updated: February 3, 2026 12:02 IST2026-02-03T12:02:17+5:302026-02-03T12:02:46+5:30

लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना सभेला उपस्थित राहण्यासाठी परवानगी मागितली जाणार आहे.

PMC Elections Lakshmi Andekar and Sonali Andekar will be released from prison again for this reason | 'या' कारणासाठी लक्ष्मी आणि सोनाली आंदेकर कारागृहातून पुन्हा बाहेर येणार  

'या' कारणासाठी लक्ष्मी आणि सोनाली आंदेकर कारागृहातून पुन्हा बाहेर येणार  

पुणे -पुणे महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना पुन्हा एकदा तुरुंगातून बाहेर आणण्यात येणार आहे. आगामी महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी होणाऱ्या मतदानात सहभागी होण्यासाठी दोघींनाही विशेष परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

९ तारखेला पुणे महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर, पुणे महानगरपालिकेच्या नगरसचिवांकडून कोल्हापूर कारागृह प्रशासनाला अधिकृत पत्र पाठवण्यात येणार आहे. या पत्राद्वारे लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना सभेला उपस्थित राहण्यासाठी परवानगी मागितली जाणार आहे.

महापालिकेकडून यासाठी आवश्यक असलेला पत्राचा ड्राफ्ट आधीच तयार करण्यात आला असून, लवकरच तो कारागृह प्रशासनाकडे पाठवला जाणार आहे. पुणे महानगरपालिकेची ही पहिली सर्वसाधारण मुख्य सभा असल्याने, या सभेत होणाऱ्या मतदानाकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. अशा परिस्थितीत, लक्ष्मी आणि सोनाली आंदेकर यांची उपस्थिती निर्णायक ठरू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

दरम्यान, लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या दोघीही सध्या आयुष कोमकर खून प्रकरणात कोल्हापूर कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. याआधीही महत्त्वाच्या मतदान प्रक्रियेसाठी त्यांना तात्पुरत्या स्वरूपात बाहेर आणण्यात आले होते.आता पुन्हा एकदा, महापौर-उपमहापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर आंदेकर भगिनींना सभेसाठी बोलावले जाणार असल्याने, पुणे महानगरपालिकेच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. ९ तारखेला होणाऱ्या सभेकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले असून, या मतदानातून नेमकी सत्ता कुणाच्या हाती जाणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title : लक्ष्मी, सोनाली आंदेकर वोट के लिए फिर जेल से बाहर?

Web Summary : राकांपा पार्षद लक्ष्मी और सोनाली आंदेकर पुणे के आगामी महापौर चुनाव में वोट डालने के लिए जेल से रिहा हो सकती हैं। कोल्हापुर जेल से अनुमति मांगी गई है, जो बारीकी से देखी जा रही नगर निगम की बैठक के लिए महत्वपूर्ण है। उनकी उपस्थिति निर्णायक हो सकती है।

Web Title : Lakshmi, Sonali Andekar to Exit Jail Again for Vote?

Web Summary : NCP corporators Lakshmi and Sonali Andekar may be released from jail to vote in Pune's upcoming mayoral election. Permission is sought from Kolhapur jail, crucial for the closely watched municipal corporation meeting. Their presence could be decisive.