पुणेकर...पुणेकर...! राज्यात एक नंबर ठरले बाप्पू मानकर; २६ हजारांहून अधिक मताधिक्याने मिळवला विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 21:59 IST2026-01-16T21:57:15+5:302026-01-16T21:59:38+5:30

PMC Election Results 2026 Bappu Mankar: पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये प्रभाग २५ मधून भाजपचे राघवेंद्र (बाप्पू) मानकर २६,४९७ मतांनी विजयी झाले आहेत. राज्यातील हा सर्वाधिक मताधिक्याचा विजय मानला जात आहे. वाचा सविस्तर निकाल.

PMC Election Results 2026: Punekar...Punekar...! Bappu Mankar became number one in the Maharashtra; won by a margin of more than 26 thousand votes | पुणेकर...पुणेकर...! राज्यात एक नंबर ठरले बाप्पू मानकर; २६ हजारांहून अधिक मताधिक्याने मिळवला विजय

पुणेकर...पुणेकर...! राज्यात एक नंबर ठरले बाप्पू मानकर; २६ हजारांहून अधिक मताधिक्याने मिळवला विजय

पुणे: नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीत पुण्याच्या राजकारणात एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २५ मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार राघवेंद्र (बाप्पू) मानकर यांनी राज्यात आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार सर्वाधिक मताधिक्य घेऊन ऐतिहासिक विजय मिळवला आहे.

एकतर्फी लढत प्रभाग २५ मध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत बाप्पू मानकर यांनी सुरुवातीपासूनच मोठी आघाडी घेतली होती. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याचा धुव्वा उडवत तब्बल २६,४९७ मतांचे अधिक्य मिळवले आहे. त्यांना एकूण 31981 मते मिळाली, तर त्यांच्या निकटतम प्रतिस्पर्धी उमेदवार समीर मनोहर गायकवाड यांना (शिवसेना उबाठा) केवळ 5484 मतांवर समाधान मानावे लागले.

राज्याचे लक्ष वेधले राज्यात इतर महापालिकांच्या निवडणुकांमध्ये अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असताना, मानकर यांनी मिळवलेले हे मताधिक्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. २६ हजारांचे हे मताधिक्य राज्यातील आतापर्यंतच्या निकालांमधील सर्वोच्च मताधिक्य मानले जात आहे. 

विजयाचा जल्लोष या विक्रमी विजयानंतर मानकर समर्थकांनी पुण्यात मोठ्या प्रमाणावर जल्लोष केला. "हा विजय माझा नसून प्रभागातील जनतेने दाखवलेल्या विश्वासाचा आहे," अशी भावना राघवेंद्र मानकर यांनी विजयानंतर व्यक्त केली.

Web Title : बापू मानकर ने पुणे चुनाव रिकॉर्ड अंतर से जीता

Web Summary : भाजपा के राघवेंद्र (बापू) मानकर ने पुणे महानगरपालिका चुनाव में 26,497 वोटों के रिकॉर्ड अंतर से ऐतिहासिक जीत हासिल की। उन्हें 31,981 वोट मिले, जबकि उनके निकटतम प्रतिद्वंद्वी को केवल 5,484 वोट मिले। यह बड़ी जीत महाराष्ट्र की राजनीति में चर्चा का विषय बन गई है।

Web Title : Bapu Mankar Wins Pune Election by Record Margin

Web Summary : Raghavendra (Bapu) Mankar of BJP secured a historic victory in Pune's municipal elections, winning by a record margin of 26,497 votes. He received 31,981 votes, while his closest competitor got only 5,484. This significant win has become a major talking point in Maharashtra politics.