यात्रेदिवशीच घर फोडी! सोने - चांदी आणि रोख रक्कमेसह आठ लाखांचा ऐवज घेऊन चोरटे पसार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 14:42 IST2023-11-29T14:42:28+5:302023-11-29T14:42:43+5:30
अज्ञात दोन चोरट्यांनी कुलुप कशाचे तरी सहाय्याने तोडुन घरामध्ये प्रवेश करुन घरातील वस्तू चोरल्या

यात्रेदिवशीच घर फोडी! सोने - चांदी आणि रोख रक्कमेसह आठ लाखांचा ऐवज घेऊन चोरटे पसार
वरवंड : ता- दौंड वरवंड येथील बारवकर वस्ती येथे यात्रेच्या दुसऱ्या दिवशी आज्ञात चोरट्यांनी घर फोडून घरातील ७२ हजार रोख रक्कम व मौल्यवान सोने-चांदीचा एकूण ८ लाख ६ हजार ५०१ रुपयांचा ऐवज चोरुन पसार झाल्याची घटना घडली आहे
महादेव ईश्वर जाधव (वय ६१, रा. वरवंड (बारवकर वस्ती कडेठाण रोड) यांच्या घरी सोमवारी (दि.२७) रात्रीच्या सुमारास ही घरफोडीची घटना घडली. रविवारी आणि सोमवारी वरवंड येथील यात्रा होती. सोमवारी महादेव जाधव यांचा मुलगा एका रूमला कुलूप लावून यात्रेत तमाशा पाहण्यासाठी गेले होते. तर घरातील रूममध्ये महादेव व त्यांची पत्नी व मुलगी घरातील एका रूमला आतून कडी लावून झोपली. अज्ञात दोन चोरट्यांनी कुलुप कशाचे तरी सहाय्याने तोडुन घरामध्ये प्रवेश करुन घरातील रूममधील लोखंडी कपाट उघडून कपाटामधील पर्समधील सोन्याचे दागिने व ७२ हजार रूपये रोख रक्कम तसेच शेजारीच असलेल्या दुसऱ्या लोखंडी कपाटामधील लॉकरमध्ये असणारे डब्यामधील चांदीच्या मूर्ती, किचन रूममधील सोन्याचा गंठण व मंगळसुत्र असा एकूण आठ लाख सहा हजार पाचशे रुपये चोरट्याने चोरून नेला. तसेच वरवंड गावातील कैलास नानासो शितोळे यांचेही घरी चोरी केली.
महादेव जाधव यांच्या फिर्यादीवरून यवत पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, यात्रे दिवशीच चोरीची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.घटनास्थळी यवत पोलीस स्टेशन चे पोलिस अधिकारी व पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संजय नागरगोजे हे करीत आहेत.