शहनाज गिलला मिळाला बेस्ट आयडॉल अवॉर्ड, फोटो शेअर करत लिहिले की, 'आतापर्यंतचा माझा सर्वात महागडा पुरस्कार'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 01:01 PM2021-01-22T13:01:09+5:302021-01-22T13:01:09+5:30

शहनाज कौर गिल पंजाबची प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री आहे. शहनाज कौर गिलचा जन्म २७ जानेवारी, १९९३ साली पंजाबमधील चंढीगढमध्ये झाला होता.

शहनाज गिल लेटेस्ट फोटोमुळे चर्चेत येत असते. नुकतेच शहनाज गिलने सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर बेस्ट आयडॉल पुरस्काराचे फोटो शेअर केले आहेत.

शहनाज गिलने कॅप्शन देत लिहिले की, हा आतापर्यंतचा सर्वात किमती पुरस्कार आहे. तिने लिहिले की, हा पुरस्कार माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.

शहनाज गिलचे चाहते या फोटोवर लाइक्स वर्षाव करत आहे. सोबतच कमेंट्स करत आहे आणि फोटोला पसंती मिळते आहे.

शहनाज कौर गिलने २०१५ साली मॉडेल म्हणून सिनेइंडस्ट्रीत काम सुरू केले होते.

शहनाज कौर गिलने २०१९मध्ये पहिला पंजाबी चित्रपट काला शाह कालामध्ये सरगुन मेहता, जॉर्डन संधू आणि बिन्नू ढिल्लनसोबत चांगला अभिनय केला.

शहनाज कौर गिल बिग बॉस १३ मुळे चर्चेत आले आहेत.

शहनाज गिल सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह राहते. शहनाज गिलचे इंस्टाग्रामवर ६.७ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.