'शरीर प्रदर्शन ही...', शर्टचं बटण उघडं ठेवून बोल्ड फोटोशूट केल्यामुळे मराठमोळी अभिनेत्री झाली ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2022 19:49 IST2022-12-24T19:39:42+5:302022-12-24T19:49:18+5:30

अभिनेत्रीच्या या फोटोशूटवर लोकांनी नाराजी व्यक्त करत संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री अक्षया गुरवने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात घर केले आहे.

तिने अनेक मालिका व चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

लव्ह लग्न लोचा या मालिकेतून अक्षया घराघरात पोहचली.

अक्षया गुरव सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते.

अक्षया गुरव बऱ्याचदा सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर करताना दिसते.

दरम्यान नुकतेच अक्षयाने बोल्ड फोटोशूट केले आहे, ज्याची सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे.

या फोटोशूटमध्ये तिने व्हाईट रंगाचे शर्ट घातले आहे, पण त्याची बटणं उघडी ठेवली आहेत.

अक्षयाला या फोटोशूटमुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागतो आहे.

अनेकांनी तिच्या या फोटोवर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका युजरने म्हटले की, तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. जेव्हा कलाकरांना काम मिळत नाही, तेव्हा ते शरीर प्रदर्शन करुन चर्चेत येण्याचा व काम मिळवण्याचा प्रयत्न करतात.

तर दुसऱ्या युजरने लिहिले की, अक्षया शरीर प्रदर्शन ही फॅशन नसून विकृती आहे. जी समाजाला अधोगतीकडे घेऊन जात आहे. त्यात आज तुही योगदान दिलं आहेस.