Photos: हृता दुर्गुळेचा प्रियकर कोण आहे माहितीये? जाणून घ्या प्रतिक शाहविषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 12:27 PM2021-11-21T12:27:13+5:302021-11-21T12:34:07+5:30

Hruta durgule: 'फुलपाखरू', 'दुर्वा' या मालिकांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या हृताचे आज असंख्य चाहते असल्याचं पाहायला मिळतं.

'फुलपाखरू', 'दुर्वा' या मालिकांच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या हृताचे आज असंख्य चाहते असल्याचं पाहायला मिळतं. (फोटो सौजन्य: सर्व फोटो हृता दुर्गुळे/ प्रतिक शाह इन्स्टाग्राम पेज)

सध्या हृता 'मन उडू उडू झालं' या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या हृताविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या हृताने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे.

हृताने तिच्या प्रियकरासोबत एक फोटो शेअर केला असून या फोटोला दिलेल्या कॅप्शनमधून तिने तिचं प्रेम व्यक्त केलं आहे. विशेष म्हणजे तिच्या या पोस्टनंतर ती चांगलीच चर्चेत आली आहे.

"मला तुझ्यामध्ये अशी आशा सापडली आहे. जी मला कधीच माहित नव्हती", असं कॅप्शन हृताने या फोटोला दिलं आहे.

हृताने प्रियकरासोबतचा फोटो शेअर केल्यानंतर तिच्या जीवनात आलेली ही नवी व्यक्ती कोण हे जाणून घेण्यासाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत.

हृताच्या प्रियकराचं नाव प्रतिक शाह असून तो लोकप्रिय टीव्ही दिग्दर्शक आहे. प्रतिकने आतापर्यंत अनेक गाजलेल्या मालिकांचं दिग्दर्शन केलं आहे.

'बेहद २', 'बहू बेगम', 'कुछ रंग प्यार के ऐसे भी', 'तेरी मेरी एक जिंदड़ी' या मालिकांसाठी त्याने काम केले आहे.

अभिनेत्री हृता दुर्गुळे हिने 'दुर्वा' या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. त्यानंतर तिने 'फुलपाखरू' मालिकेत काम केले.