संजना-अरुंधतीला विसरा! अनिरुद्धच्या रिअल लाइफ पत्नीला एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 05:00 PM2021-10-18T17:00:00+5:302021-10-18T17:00:00+5:30

Milind gawali: संजना, अरुंधती, अनिरुद्ध, आप्पा, आई, यश या भूमिका साकारणाऱ्या प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं आहे.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'म्हणजे आई कुठे काय करते?'. अल्पावधीत या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली असून आज लोकप्रिय मालिकांच्या यादीत ही मालिका प्रथम स्थानावर असल्याचं पाहायला मिळतं.

संजना, अरुंधती, अनिरुद्ध, आप्पा, आई, यश या भूमिका साकारणाऱ्या प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं आहे. त्यामुळे या प्रत्येकाविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात.

यामध्येच अरुंधती, संजना आणि अनिरुद्ध या तीन मुख्य पात्रांविषयी प्रेक्षकांच्या मनात असंख्य प्रश्न आहेत.

या मालिकेत अभिनेता मिलींद गवळी यांनी अनिरुद्ध ही भूमिका साकारली आहे. आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या मिलींद यांच्या कुटुंबाविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात.

मिलींद यांचं लग्न झालं असून त्यांच्या पत्नीचं नाव दिपा गवळी असं आहे. मिलींद व दिपा यांचं लव्ह मॅरेज असून त्यांची लव्हस्टोरी भन्नाट असल्याचं म्हटलं जातं.

मिलींद यांची पत्नी दिपा दिसायला सुंदर असून त्या कायम लाइमलाइटपासून दूर राहत असतात.

मिलींद गवळी मूळचे मुंबईचे आहेत. त्यांना आणि दिपा यांना मिथिला ही एक मुलगीदेखील आहे.

मिथिलाचं २०१८ मध्ये लग्न झालं असून ती उत्तम नृत्यांगना आहे.