हिऱ्यांनी जडलेला सोन्याचा मुकुट! २० लाख रूपये किंमत; 'किन्नर'ची साईबाबांना भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2023 01:40 PM2023-07-05T13:40:02+5:302023-07-05T13:42:13+5:30

साईबाबांना हा मुकुट अर्पण करण्यापूर्वी मंदिरात सर्वप्रथम मुकुटाची विधिवत पूजा करण्यात आली.

पंजाबच्या चंदीगडमध्ये एका किन्नरने तेथील प्रसिद्ध साई मंदिरात २६ तोळे हिऱ्यांनी सोन्याचा मुकुट भेट दिला आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त किन्नर बंटी महंत यांनी दिलेली ही भेट चर्चेचा विषय ठरली आहे.

२६.४ तोळ्यांचे असलेले हे मुकुट जवळपास २० लाख रूपयांचे आहे.

चंदीगडच्या सेक्टर ३७ येथील स्थानिक ज्वेलर्सने हा मुकुट तयार केला आहे. या मुकुटामध्ये हिरे आणि मोती देखील बसवण्यात आले आहेत.

खरं तर दरवर्षी शिर्डीला जाऊन साई बाबांची सेवा करण्याचा मानस किन्नर बंटीचा आहे. त्यांनी सांगितले की, यंदा चंदीगडच्या साई मंदिरात सेवा केली आणि ही छोटी भेट दिली.

साईबाबांना हा मुकुट अर्पण करण्यापूर्वी मंदिरात सर्वप्रथम मुकुटाची विधिवत पूजा करण्यात आली.

किन्नर बंटीने सांगितले की, जिथे साई दिसतात तीच शिर्डी आहे. लोकांमध्ये साई रामबद्दल खूप श्रद्धा आहे. चंदीगडमधील या मंदिरात केवळ आसपासचीच लोक येत नसून खूप लांबून भक्त इथे येत असतात.

मुकुट साई बाबांच्या मूर्तीला घालण्यापूर्वी उत्तराखंडमधील हरिद्वार येथून आणलेल्या गंगाजलने साईंच्या प्रतिमेला जलाभिषेक घालण्यात आला.