भंगारवाल्याने एवढ्या किंमतीत घेतले वायू दलाचे 6 हेलिकॉप्टर, लगेच 3 विकलेही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2021 06:30 PM2021-06-25T18:30:49+5:302021-06-25T18:53:07+5:30

पंजाबच्या मानसामध्ये वास्तव्यास असलेल्या एका भंगारवाल्यानं भारतीय हवाई दलाची ६ हेलिकॉप्टर ऑनलाईन लिलावातून विकत घेतली आहेत.

पंजाबच्या मानसामध्ये वास्तव्यास असलेल्या एका भंगारवाल्यानं भारतीय हवाई दलाची ६ हेलिकॉप्टर ऑनलाईन लिलावातून विकत घेतली आहेत.

या प्रत्येक हेलिकॉप्टरचं वजन १० टन असून बोलीच्या माध्यमातून भंगारवाल्यानं हेलिकॉप्टरची खरेदी केली आहे. भंगारवाल्यानं एकूण ६ हेलिकॉप्टर खरेदी केली होती.

त्यापैकी एक मुंबईतील एका व्यक्तीनं खरेदी केलं. तर दोन हेलिकॉप्टर लुधिनायातील एका हॉटेल व्यवसायिकानं खरेदी केली. आता उर्वरित तीन हेलिकॉप्टर मानसामध्ये उभी आहेत.

मात्र, आपल्याकडी आणखी 2 हेलिकॉप्टर विकून केवळ एक हेलिकॉप्टर आपल्याकडे संग्रहीत म्हणून ठेवण्याचा मानस मिठ्ठू यांनी बोलून दाखवला आहे.

मानसामध्ये उभी असलेली तीन हेलिकॉप्टर सध्या स्थानिकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहेत. पंजाबमध्ये मिठ्ठू भंगारवाल्याचं नाव प्रसिद्ध आहे.

मिठ्ठू यांनी लिलावात 72 लाख रुपयांना हे 6 हेलिकॉप्टर खरेदी केली आहेत. त्यापैकी तीन हेलिकॉप्टर त्यांनी 12 ते 15 लाख प्रत्येकी अशा किंमतीत विकले आहेत.

पंजाबमधील त्यांच्या मानसा येथील त्यांच्या 6 एकर जमिनीवर तीन हेलिकॉप्टर त्यांनी आणून ठेवले आहेत. विशेष म्हणजे एक हेलिकॉप्टर इथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना 75 हजार रुपयांचा खर्च आला आहे.

सध्या तीन हेलिकॉप्टर्स मानसामध्ये उभी आहेत. ही हेलिकॉप्टर्स पाहायला लोकांची गर्दी होत आहे. अनेक जण इथे येऊन हेलिकॉप्टरचे फोटो आणि सेल्फी काढत आहेत.

मानसा शहरातील कित्येक जण येऊन हेलिकॉप्टरमध्ये बसत आहेत, त्याच्या शेजारी येऊन उभे राहत आहेत. हवाई दलाच्या सेवेत असलेल्या हेलिकॉप्टरसोबत फोटो काढण्याची खूप कमी जणांना मिळते.

त्यामुळेच हवाई दलानं वापरलेल्या, सेवेतून निवृत्त झालेल्या हेलिकॉप्टरसोबत फोटो काढण्याची संधी अनेक जण साधत आहेत. त्याबद्दल भंगारवाल्यानं आनंद व्यक्त केला.