PHOTOS : तिची अदा, करी फिदा...!! सोनाली कुलकर्णीचा साडीतील मोहक व सुंदर लुक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 04:41 PM2021-07-13T16:41:59+5:302021-07-13T16:56:01+5:30

पावसाळी वातावरण, हिरवळ, गारवा, बोगनवेल आणि साडी...! सोनाली कुलकर्णीच्या फोटोंवर खिळली चाहत्यांची नजर...!!

पावसाळी वातावरण..हिरवळ, गारवा, बोगनवेल आणि साडी माझ्या काही आवडीच्या गोष्टी, असं सांगत सोनाली कुलकर्णीने फोटो शेअर केलेत आणि ते क्षणात व्हायरल झालेत.

पिवळ्या-गुलाबी रंगाच्या साडीतील सोनालीच्या अदा काही औरच.

सोनालीच्या या फोटोंवर चाहते अक्षरश: फिदा झाले आहेत. या पारंपरिक साडीमध्ये सोनालीचं रूप अगदी खुलून दिसत आहे.

पारंपरिक कपड्यांपासून ते वेस्टर्न आउटफिटपर्यंत, सर्वच प्रकारच्या कपड्यांमध्येसोनाली मोहकच दिसते. पण साडीमध्ये सोनालीचे सौंदर्य अधिक खुलून दिसते.

सोनालीने आपल्या शानदार अभिनयाप्रमाणेच स्टाइल स्टेटमेंटनेही चाहत्यांच्या हृदयात स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी चाहत्यांची अत्यंत लाडकी आहे. तिने तिच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली.

सोनालीने आजवर 'हिरकणी', 'मितवा', 'धुरळा', 'क्लासमेट' यांसारख्या अनेक हिट चित्रपटात काम केलं आहे.

'नटरंग' या चित्रपटातील सोनालीची भूमिका विशेष गाजली होती. या चित्रपटात सोनालीचं तिचं नृत्य कौशल्य प्रेक्षकांना भावलं होतं.

सोनालीच्या 'हिरकणी' चित्रपटातील भूमिकेचं देखील प्रेक्षकांनी कौतुक केलं होतं.

सोनालीने मराठीसोबत हिंदी चित्रपटातही काम केले. ग्रँड मस्ती ह्या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रसृष्टीमध्ये प्रवेश केला व रितेश देशमुखच्या पत्नी ममताची भूमिका केली.