जान्हवी कपूरसोबत व्हॅकेशन एन्जॉय करणारा मिस्ट्री बॉय कोण, चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 03:03 PM2021-06-16T15:03:27+5:302021-06-16T15:48:44+5:30

सेलिब्रेटी मंडळी या ना त्या कारणामुळे सतत चर्चेत असतात. जान्हवी कपूरही नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. चर्चेत येण्यासाठी एक फोटो कारणीभूत ठरला आहे.

जान्हवी नेहमीच वेळ मिळताच वेगवेगळ्या ठिकाणी भटकंती करताना दिसते.

सोशल मीडियावर नजर टाकल्यास तुम्हाला तिचे व्हॅकेशन एन्जॉय करतानाचे फोटोच जास्त पाहायला मिळतील.

अशाच एका फोटोने नेटीझन्सचे लक्ष वेधले आहे.

समुद्रकिनारी मस्त एन्जॉय करताना जान्हवी दिसते. मात्र यावेळी ती एकटी नसून तिचा मित्रसुद्ध तिच्याबरोबर आहे.

हातात हात घालून दोघेही समुद्राच्या दिशेने एन्जॉय करण्यासाठी धावताना दिसत आहे.

यावेळी जान्हवीपेक्षा या मिस्ट्री बॉयनेचे नेटीझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे.

फोटो पाठमोरा असल्याने चेहरा दिसत नाहीय.

त्यामुळे जान्हवीसोबत असलेला व्यक्ती कोण हे जाणून घेण्याचीही रसिकांची प्रचंड उत्सुकता वाढली आहे.

हा फोटोपाहून जान्हवी रिलेशनशिपमध्ये असल्याच्याही चर्चा सुरु झाल्या आहेत.

जान्हवीचा हा फोटो पाहून कमेंट्स करत हा व्यक्ती कोण ?असेही विचारताना दिसतायेत.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Read in English