महेश बाबू ते प्रभास...! जाणून घ्या साऊथच्या या 14 सुपरस्टार्सचे ‘टॉप सीक्रेट’
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2020 15:27 IST2020-08-11T15:16:18+5:302020-08-11T15:27:09+5:30
वाचून थक्क व्हाल...

महेश बाबू - साऊथ फिल्म सेन्सेशन महेश बाबूबद्दल सगळेच जाणतात. पण त्याचे खरे नाव महेश बाबू नाही, हे तुम्हाला ठाऊक आहे का? महेश बाबूचे खरे नाव महेश घट्टा मानेनी आहे.
प्रभास - साऊथ सुपरस्टार ‘बाहुबली’ प्रभासचे खरे नाव इतके मोठे आहे की, ते लक्षात ठेवणेही कठीण. त्याचे खरे नाव व्यंकट सत्यनारायण प्रभास राजू उप्पलपति आहे.
राणा दग्गुबाती - बाहुबलीचा भल्लालदेव अर्थात अभिनेता राणा दग्गुबातीचे खरे नाव रामानायडू दग्गुबाती आहे.
ज्युनिअर एनटीआर - सर्वांचा लाडका साऊथ स्टार ज्युनिअर एनटीआरचे नावही एका लांबलचक आहे. नंदामुरी तारक रामा राव ज्युनिअर असे त्याचे पूर्ण नाव आहे.
धनुष - सुपरस्टार रजनीकांत यांचा जावई व अभिनेता धनुष याचे खरे नाव व्यंकटेश प्रभु आहे.
रजनीकांत - तामिळ सुपरस्टार, चाहत्यांच्या गळ्यातील ताईत रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड आहे.
विजय - थालापती विजय नावाने ओळखला जाणारा तामिळ सुपरस्टारचे खरे नाव जोसेफ विजय चंद्रशेखर आहे.
विक्रम - ‘आय’ फेम सुपरस्टार विक्रमचे खरे नाव केन्नडी जॉन विक्टर आहे.
सूर्या - साऊथ स्टार सूर्याचे खरे नाव सरवानन शिवकुमार आहे.
चिरंजीवी - तेलगू स्टार चिरंजीवी यांच्या नावात तर चिरंजीवी हा शब्दही येत नाही. त्यांचे खरे नाव कोनिदेला शिवशंकर वारा प्रसाद आहे.
पवन कल्याण - अभिनेता पवन कल्याण याचे खरे नाव काय तर कोनिदेला कल्याण बाबू.
कमल हासन - कमल हासन यांचे खरे नाव ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटले. त्यांचे खरे नाव पार्थसारथी आहे.
ममुटी - मल्याळम सुपरस्टार ममूटी यांचे खरे नाव आहे मुहम्मद कुट्टुी इस्माइल पैनीपरम्बिल.
मोहनलाल - मोहनलाल यांचे खरे नाव मोहनलाल विश्वनाथन आहे.