नोरा फतेहीचा सुपर बोल्ड अंदाज व्हायरल, फॅन्स म्हणाले - आग लगा दी, आग लगा दी...आग...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2021 05:36 PM2021-07-29T17:36:08+5:302021-07-29T18:12:03+5:30

Nora Fatehi : नोरा फतेही लवकरच अजय देवगनच्या भुज- द प्राइड ऑफ इंडिया सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा डिज्ने प्लस हॉटस्टारवर लवकरच रिलीज होणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही (Nora Fatehi) आपल्या सुपरफिट बॉडीमुळे आणि जबरदस्त डान्समुळे सतत चर्चेत असते. तिचं गाणं 'जालिमा कोका कोला' सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अशात तिच्या नव्या फोटोशूटमधील फोटो समोर आले आहेत.

या फोटोंमध्ये नोरा फतेही समुद्र किनारी वाळूत बसलेली आहे. तिने टायगर पॅटर्नमध्ये रिव्हीलिंग ड्रेस घातलेला आहे.

या आउटफिटमधील नोराचा अंदाज तिच्या फॅन्सना फारच आवडला आहे. तिचे फॅन्स तिचं भरभरून कौतुक करत आहेत.

इन्स्टाग्रामवर नोरा फतेहीच्या फॅन फॉलोइंगने ३ कोटींचा आकडा पार केला आहे. हा आनंद तिने फॅन्ससोबत नवे फोटो शेअर करून साजरा केला.

नोराचे हे फोटो फॅन्सना इतके आवडले की, केवळ २ तासांमध्ये तिच्या या फोटोंना ११ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. कॉमेंट बॉक्समध्ये फॅन्स भरभरून कमेंट्स करत आहेत.

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर नोरा लवकरच अजय देवगनच्या भुज- द प्राइड ऑफ इंडिया सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा डिज्ने प्लस हॉटस्टारवर लवकरच रिलीज होणार आहे.

Read in English