मिथून चक्रवर्तीची सूनही आहे प्रसिद्ध अभिनेत्री; 'अनुपमा' मालिकेत करतीये काम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 08:00 AM2022-03-30T08:00:00+5:302022-03-30T08:00:06+5:30

Mithun chakraborty: मिथून चक्रवर्ती यांच्या प्रोफेशनल लाइफविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र, यावेळी आपण त्यांच्या पर्सनल लाइफविषयी जाणून घेऊयात.

बॉलिवूडचा डिस्को डान्स म्हणून विशेष लोकप्रिय असलेले अभिनेते म्हणजे मिथून चक्रवर्ती.

आपल्या डान्स स्टाइल आणि अभिनयाच्या जोरावर मिथून यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली.

मिथून चक्रवर्ती यांच्या प्रोफेशनल लाइफविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र, यावेळी आपण त्यांच्या पर्सनल लाइफविषयी जाणून घेऊयात.

मिथून चक्रवर्ती यांच्याप्रमाणेच त्यांची सूनदेखील कलाविश्वात सक्रीय आहे.

मिथून चक्रवर्ती यांच्या सुनेचं नाव मदालसा शर्मा असं असून तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

मदालसा सध्या अनुपमा या मालिकेत काम करत आहे. या मालिकेत ती नकारात्मक भूमिका साकारत आहे.

मदालसा सोशल मीडियावर सक्रीय असून तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.

मदालसाने मिथून चक्रवर्ती यांचा लेक महाअक्षय चक्रवर्ती याच्यासोबत २०१८ मध्ये लग्न केलं.

मदालसा आणि महाअक्षय यांच्या लग्नाचा फोटो