साऊथचा सुपरस्टार महेश बाबूची व्हॅनिटी व्हॅन शाहरूखच्या व्हॅनपेक्षाही आहे महाग, किंमत वाचाल तर चक्रावून जाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 11:57 AM2020-07-28T11:57:44+5:302020-07-28T12:14:49+5:30

महेश बाबूच्या लाइफस्टाईलबाबत माहिती जाणून घेणं त्याच्या फॅन्सना नेहमीच आवडतं. आज आम्ही तुम्हाला महेश बाबूच्या लक्झरी बंगल्यासारख्या लक्झरी व्हॅनीटीची सफर करवणार आहोत.

साऊथचा सुपरस्टार महेश बाबू याची लोकप्रियता किती हे काही कुणाला सांगायची गरज नाही. आपल्या लूकने, अभिनयाने आणि धमाकेदार अॅक्शनने तो प्रेक्षकांच्.या मनात घर करून आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत त्याचे फॅन्स आहेत.

त्याच्या लाइफस्टाईलबाबत माहिती जाणून घेणं त्याच्या फॅन्सना नेहमीच आवडतं. आज आम्ही तुम्हाला महेश बाबूच्या लक्झरी बंगल्यासारख्या लक्झरी व्हॅनीटीची सफर करवणार आहोत.

महेश बाबूकडे सर्व सोयीसुविधा असलेली एक लक्झरी व्हॅनिटी व्हॅन आहे. या व्हॅनिटीची किंमत वाचून तुम्ही हैराण व्हाल. महेश बाबूच्या व्हॅनिटी व्हॅनची किंमत जवळपास ६.०२ कोटी रुपये इतकी आहे. त्याची ही व्हॅनिटी व्हॅन शाहरूख खानच्या व्हॅनिटी व्हॅनपेक्षा जास्त महागडी आहे.

महेश बाबू आणि नम्रता यांचा हैदराबादमधील जुबली हिल्समध्ये बंगला आहे. या बंगल्याची किंमत जवळपास १४ कोटी रुपये आहे.

महेश बाबूने करियरची सुरूवात वयाच्या चौथ्या वर्षी बालकलाकार म्हणून केली होती. महेश बाबूने १९९९ साली 'राजा कुमारुदु' चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केलं. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री प्रिती झिंटा मुख्य भूमिकेत होती.

महेश बाबू शाळेत होते तेव्हा मित्रांना आपल्या वडिलांचं नाव सांगत नव्हते. त्यांच्या वडिलांनीच त्यांना असं करायला सांगितलं होतं. कारण महेश बाबूच्या वडिलांना त्याने त्यांच्या नावाचा वापर करू नये असं वाटत होतं.

महेश बाबूच्या पर्सनल लाईफबद्दल सांगायचं तर त्याने अभिनेत्री नम्रता शिरोडकरसोबत २००५ साली लग्न केले. महेश बाबू व नम्रता यांची पहिल्यांदा भेट २००० साली वामसी चित्रपटादरम्यान झाली होती. लग्नाच्या आधी पाच वर्षे त्यांनी एकमेकांना डेट केलं होतं.

Read in English