Holi 2020:होळीची 10 सुपरहिट दमदार गाणी, रंगं बरसे पासून बलम पिचकारीपर्यंतची एव्हरग्रीन गाणी जरूर ऐका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2020 11:14 AM2020-03-10T11:14:48+5:302020-03-10T11:22:47+5:30

Holi's superhit songs

रंग बरसे हे गाणं दरवर्षी होळीला ऐकायला मिळतंच

शोले चित्रपटात (1975) धर्मेंद्र आणि हेमा मालिनीवर चित्रीत केलेलं गाणंदेखील प्रेक्षकांना खूप भावते आहे. हे गाणं किशोर कुमार व लता मंगेशकर यांनी गायले होते.

यह जवानी है दिवानी (2013) चित्रपटात दीपिका पादुकोण व रणबीर कपूर यांच्यावर चित्रीत झालेले बलम पिचकारी हे गाणं सुपरहिट ठरलं. या गाण्याला शाल्मली खोलगडे आणि विशाल ददलानीने गायले आहे.

पटाखा (2018) चित्रपट मागील वर्षी प्रदर्शित झाला आहे, या चित्रपटात सान्या मल्होत्रा व राधिका मदन या जोडीला प्रेक्षकांना खूप भावली होती. या गाण्याला सुखविंदर सिंगने स्वरसाज दिला आहे. हे 

मोहब्बतें (2000) सिनेमात उदित नारायणच्या स्वरसाजात सजलेले सोनी सोनी हे गाणं दरवर्षी होळीला ऐकायला मिळतं. शाहरूखने या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. 

बागबान (2003) चित्रपटातील होली खेले रघुवीरा हे अमिताभ बच्चन यांनी गायलेले गाणे हेमा मालिनी आणि अमिताभ बच्चन यांच्यावर चित्रीत झाले आहे.

गोलियों की रासलीला राम-लीला (2013) चित्रपटात दीपिका पादुकोण व रणवीर सिंग यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. यातील होळीची पार्श्वभूमी असलेले गाणं लहू मुंह लग गया खूप लोकप्रिय ठरले होते.

वक्त (2005) चित्रपटातील डु मी अ फेवर लेट्स प्ले होली या गाण्यात अक्षय कुमार व प्रियंंका चोप्राची केमिस्ट्री खूप आवडली. 

बद्री के दुल्हनियां चित्रपटातील बद्री की दुल्हनियां हे गाणं वरूण धवन व आलिया भट यांच्यावर चित्रीत झालं आहे. या गाण्याला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता.

कटी पतंग चित्रपटातील आज न छोडेंगे हे गाणं राजेश खन्ना व आशा पारेख यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे.