मोदी ३.० मंत्रिमंडळात कुणा-कुणाला मिळू शकते जागा, सामोर आली यादी, या नावांची सुरू आहे चर्चा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2024 14:28 IST2024-06-08T14:27:36+5:302024-06-08T14:28:10+5:30
PM Narendra Modi Oath Taking Ceremony : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी आपल्या मंत्रीमंडळात सहकारी पक्षांनाही पूर्ण न्याय दिला आहे. मात्र, महत्वाची मंत्रालये भाजप आपल्याकडेच ठेवण्याची शक्यता आहे.

मोदी ३.० मंत्रिमंडळात कुणा-कुणाला मिळू शकते जागा, सामोर आली यादी, या नावांची सुरू आहे चर्चा!
PM Modi Oath Taking Ceremony : लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला सलग तिसरा विजय मिळाला आहे. यानंतर, नरेंद्र मोदीही रविवारी (९ जून २०२४) सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या शपथविधी समारंभातच, काही खासदारही मंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. सध्या मोदी ३.० च्या मंत्रिमंडळासाठी अनेक नेत्यांची नावे आघाडीवर आहेत. अनेक नावांवर चर्चा सुरू आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी आपल्या मंत्रीमंडळात सहकारी पक्षांनाही पूर्ण न्याय दिला आहे. मात्र, महत्वाची मंत्रालये भाजप आपल्याकडेच ठेवण्याची शक्यता आहे.
जदयूला मंत्रीमंडळात स्थान, होऊ शकतात २ मंत्री -
महत्वाचे म्हणजे, एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, एनडीएतील एक महत्वाचा पक्ष असलेल्या जनता दल यूनाइटेडलाही मोदी मंत्रिमंडळात चांगले स्थान मिळू शकते. जदयूच्या दोन खासदारांना मंत्री केले जाऊ शकते, असे बोलले जात आहे. यात, लोकसभा खासदार ललन सिंह आणि राज्यसभा खासदार राम नाथ ठाकूर यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते, अशी चर्चा आहे.
या नावांची सुरू आहे चर्चा! -
नाम            -                पक्ष
पीयूष गोयल    -            बीजेपी महाराष्ट्र
नारायण राणे    -            बीजेपी महाराष्ट्र
नितिन गडकरी    -            बीजेपी महाराष्ट्र
संदीपान भूमरे      -            शिवसेना शिंदे गुट
प्रताप राव जाधव-            शिवसेना शिंदे गुट
प्रफुल्ल पटेल/सुनील तटकरे-एनसीपी अजित पवार गुट
जी किशन रेड्डी        -        बीजेपी तेलंगाना
बंदी संजय            -        बीजेपी तेलंगाना
एटाला राजेंद्र        -        बीजेपी तेलंगाना
डी के अरुणा        -        बीजेपी तेलंगाना
डॉ के लक्ष्मण        -        बीजेपी तेलंगाना
राम मोहन नायडू    -        टीडीपी आंध्र प्रदेश
हरीश                  -        टीडीपी आंध्र प्रदेश
चंद्रशेखर            -        टीडीपी आंध्र प्रदेश
पुरंदेश्वरी            -        बीजेपी आंध्र प्रदेश
रमेश                 -        बीजेपी आंध्र प्रदेश
बाला शौरी            -        जनसेना पार्टी
प्रह्लाद जोशी        -        बीजेपी कर्नाटक
बसवराज बोम्मई    -        बीजेपी कर्नाटक
जगदीश शेट्टार        -        बीजेपी कर्नाटक
शोभा करंदलाजे    -        बीजेपी कर्नाटक
डॉ. सी. एन. मंजूनाथ    -        बीजेपी कर्नाटक
एच. डी. कुमारस्वामी    -        जेडीएस कर्नाटक
सुरेश गोपी        -        बीजेपी केरल
वी. मुरलीधरन        -        बीजेपी केरल
राजीव चंद्रशेखर    -        बीजेपी केरल
एल मुरगन            -        बीजेपी तमिलनाडु
के अन्नमलाई        -        बीजेपी तमिलनाडु