मायावती आणि अखिलेश यांचा कंट्रोलर मोदींच्या हातात, राहुल गांधींची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 17:20 IST2019-05-01T17:18:43+5:302019-05-01T17:20:27+5:30

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

Mayawati and Akhilesh's Controller in Modi's Hand - Rahul Gandhi | मायावती आणि अखिलेश यांचा कंट्रोलर मोदींच्या हातात, राहुल गांधींची टीका 

मायावती आणि अखिलेश यांचा कंट्रोलर मोदींच्या हातात, राहुल गांधींची टीका 

बाराबंकी - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्यावर जोरदार टीका केली. मायावती आणि अखिलेश यादव यांचा रिमोट कंट्रोल नरेंद्र मोदींच्या हातात आहे, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला. 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची आज उत्तर प्रदेशमधील बाराबंकी येथे सभा झाली. यावेळी राहुल गांधी यांनी अखिलेश यादव आणि मायावतींवर जोरदार हल्लाबोल केला. ''मायावतीजी आणि अखिलेश यादवजींचा कंट्रोलर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात आहे. मात्र मोदी हे बीएसपी-एसपीवर दबाव आणू शकतात. पण मोदी हे माझ्यावर दबाव आणू शकत नाहीत, हे लक्षात ठेवा, असे राहुल गांधी म्हणाले. 




उत्तर प्रदेशमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाला आव्हान देण्यासाठी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने महाआघाडी केली आहे. मात्र या महाआघाडीत काँग्रेसला सहभागी करून घेण्यात आलेले नाही. त्यामुळे काँग्रेस उत्तर प्रदेशामध्य स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवत आहे. 

Web Title: Mayawati and Akhilesh's Controller in Modi's Hand - Rahul Gandhi