मदीना बस अपघातात एकाच कुटुंबातील 18 जणांचा मृत्यू; नातेवाईक म्हणाले- अल्लाहने त्यांच्या नशिबात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 12:20 IST2025-11-18T12:19:59+5:302025-11-18T12:20:42+5:30
Madinah Bus Accident: सौदी अरेबियातील मदीना येथे उमराहसाठी गेलेल्या 42 भारतीयांचा बस अपघातात मृत्यू झाला आहे.

मदीना बस अपघातात एकाच कुटुंबातील 18 जणांचा मृत्यू; नातेवाईक म्हणाले- अल्लाहने त्यांच्या नशिबात...
Madinah Bus Accident: सौदी अरेबियातील मदीना येथे सोमवारी (17 नोव्हेंबर) झालेल्या भयंकर बस अपघाताने भारतात शोककळा पसरली आहे. उमराहसाठी गेलेल्या 42 भारतीय यात्रेकरुंचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये 20 महिला आणि 11 मुले असून सर्वजण हैदराबाद येथील रहिवासी होते. विशेष म्हणजे, या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 18 जणांचा मृत्यू झाला आहे.
Press Release on a tragic bus accident late last night involving Indian Umrah pilgrims, near Madinah, Saudi Arabia.@MEAIndia@IndianDiplomacy@IndianEmbRiyadh@diaspora_india@CPVIndia@SecretaryCPVOIApic.twitter.com/kiNt3XY1aW
— India in Jeddah (@CGIJeddah) November 17, 2025
धावती बस डिझेल टँकरला धडकली
प्राथमिक माहितीनुसार, यात्रेकरुंनी भरलेली बस मक्का ते मदीना प्रवास करत असताना एका डिझेल टँकरला धडकली. धडकेनंतर काही क्षणातच बसला भीषण आग लागली आणि बहुतांश प्रवासी आतच अडकले. या भीषण दुर्घटनेत फक्त एकच व्यक्ती जिवंत बाहेर आला.
एकाच कुटुंबातील 18 जणांचा मृत्यू
बसमधील सर्वजण हैदराबादमधील रहिवासी होते. या दुःखद घटनेने अनेक कुटुंबात शोककळा पसरली आहे. एएनआयशी बोलताना एका पीडित नातेवाईकाने सांगितले की, 'या अपघातात माझे सासू, सासरे, मेहुण्यांसह 18 जण दगावले. अल्लाहने त्यांच्या नशिबात ती जागा लिहिली होती.' अनेक पीडित कुटुंबीयांनी सरकारकडे मृतदेह घेण्यासाठी किंवा अंतिम संस्कारासाठी साऊदीला जाण्याची विनंती केली आहे.
Consul General meets lone survivor of Madinah bus accident
— ANI Digital (@ani_digital) November 18, 2025
Read @ANI Story |https://t.co/ru1kXQ36c9#ConsulGeneral#LoneSurvivor#Madinah#BusAccidentpic.twitter.com/Et4k9odoXy
पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्र्यांची प्रतिक्रिया
या हृदयद्रावक घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. तसेच, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले की, 'भारतीय दूतावास सौदी अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.' हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीदेखील या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले.
धक्कादायक! धावत्या अँम्बुलन्सला भीषण आग, नवजात बालकासह चार जणांचा होरपळून मृत्यू