‘मोदी श्रीरामांचा अवतार, मी रामसेतूची खार’, कंगना रनाैत यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2024 10:15 IST2024-04-02T10:14:57+5:302024-04-02T10:15:59+5:30

Kangana Ranaut News: हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार कंगना रनाैत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वर्णन भगवान श्रीरामांचा अवतार असे केले आहे. स्वतःला त्यांनी रामसेतूची खार, असे म्हटले आहे.

Lok Sabha Election 2024: 'Modi is an incarnation of Shri Ram, I am the salt of Ram Setu', claims Kangana Ranaut | ‘मोदी श्रीरामांचा अवतार, मी रामसेतूची खार’, कंगना रनाैत यांचा दावा

‘मोदी श्रीरामांचा अवतार, मी रामसेतूची खार’, कंगना रनाैत यांचा दावा

- बलवंत तक्षक
 चंडीगड : हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार कंगना रनाैत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वर्णन भगवान श्रीरामांचा अवतार असे केले आहे. स्वतःला त्यांनी रामसेतूची खार, असे म्हटले आहे.

कंगणा रनाैत म्हणाल्या की, मोदी हे सामान्य व्यक्तिमत्त्व नाही. सहाशे वर्षांतही राममंदिर बांधता आले नाही, जे काम शतकानुशतके होऊ शकले नाही, ते काम देवाने त्यांच्या हातांनी करून दाखवले आहे. त्यांच्या सेनेत भरती होण्याची संधी मिळाल्याने आपण भाग्यवान आहोत, असे त्या म्हणाल्या. त्यांनी ‘चाय पे चर्चा’ उपक्रमांतर्गत मतदारांसोबत चर्चा केली आणि स्वत: चहा बनवून लोकांना दिला.

Web Title: Lok Sabha Election 2024: 'Modi is an incarnation of Shri Ram, I am the salt of Ram Setu', claims Kangana Ranaut