Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 15:38 IST2024-05-15T15:27:22+5:302024-05-15T15:38:35+5:30
Lok Sabha Election 2024 BJP Kangana Ranaut : मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवार कंगना राणौत आणि काँग्रेस नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपा उमेदवार कंगना राणौत आणि काँग्रेस नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. याच दरम्यान, कंगना राणौत म्हणाली की, मी भांडत नाही, पण जर तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा मार खाण्याची तयारी ठेवा. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत निवडणुकीतील विजय हा तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट असेल असं सांगितलं.
मंडी मतदारसंघातील काँग्रेसचे प्रतिस्पर्धी उमेदवार विक्रमादित्य सिंह यांनी केलेल्या टीकेच्या संदर्भ देत कंगना राणौत म्हणाली की, निवडणुका मुद्द्यांवर लढल्या पाहिजेत, परंतु जर अपमानास्पद शब्द वापरला तर त्यांनी तशीच भाषा ऐकण्याची तयारी ठेवावी. माझा मागचा रेकॉर्ड बघा, मी कोणालाही आव्हान देऊ शकते, नेहमीच मला सर्वात आधी लक्ष्य केलं जातं.
कंगना राणौत म्हणाली, "मी कोणाशीही भांडत नाही, पण जर कोणी मला काही बोललं तर शांतपणे सहन करणारी देखील मी नाही. जर तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा मार खाण्याची तयार ठेवा." कंगना राणौतने मंगळवारी मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.
कंगनाला कुल्लू टोपी घालण्याबद्दल विचारले असता, ती म्हणाली की हा एक पारंपारिक दागिना आहे जो शुभ दिवशी परिधान केला जातो. "मला वाटलं की आज ती घालण्याची योग्य वेळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनतेचा पाठिंबा आहे. मोदींची गॅरंटी ही एकच गॅरंटी आहे" असं देखील कंगना राणौतने म्हटलं आहे.