IIT बाबाकडे आढळला गांजा, पोलिसांनी घेतले ताब्यात; म्हणाला- मला काही आठवत नाही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 16:55 IST2025-03-03T16:53:12+5:302025-03-03T16:55:05+5:30
IIT Baba Arrested: आयआयटी बाबाने सोशल मीडियावर आत्महत्येची धमकी दिली, पोलीस तात्काळ पोहोचले.

IIT बाबाकडे आढळला गांजा, पोलिसांनी घेतले ताब्यात; म्हणाला- मला काही आठवत नाही...
IIT Baba Detained: प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेला IIT बाबा उर्फ अभय सिंग अडचणीत सापडला आहे. अभय सिंगला पोलिसांनीजयपूरमधून ताब्यात घेतले आहे. अभय सिंहने सोशल मीडियावर आत्महत्येची धमकी दिली होती. त्यामुळे पोलिसांनी पार्क क्लासिक हॉटेलमधून आयआयटी बाबाला ताब्यात घेतले. पोलिसांना त्याच्याकडे गांजाही आढळून आल्यामुळे एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
VIDEO | "There are three-four fake news: one is of suicide, second is of my detention. The only truth in it is that bail was granted then and there... since the case (possession of substance was small)..." says Abhay Singh, alias 'IIT Baba'. pic.twitter.com/jTlNYTjOeu
— Press Trust of India (@PTI_News) March 3, 2025
मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेल पार्क क्लासिकमध्ये राहणारा अभय सिंह आत्महत्येचा प्रयत्न करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. यावेळी बाबा गांजाच्या नशेत आढळला. अभय सिंहने त्याच्याकडे असलेला गांजाही पोलिसांना दाखवला. यानंतर पोलिसांनी बाबाला अटक केली अन् एनडीपीएस कायद्यांतर्गत (नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ॲक्ट) कारवाई केली.
मी काय बोलले, मला आठवत नाही...
त्याच्याकडून सापडलेल्या गांजाचे वजन 1.50 ग्रॅम असून, तो पोलिसांनी एनडीपीएस कायद्यान्वये जप्त केला आहे. गांजा अल्प प्रमाणात असल्याने त्याला इशारा देऊन सोडण्यात आले. दरम्यान, मी गांजाच्या नशेत होतो. त्यामुळे आत्महत्येसंदर्भात काय बोललो, याची मलाच माहिती नाही, असे अभय सिंहने पोलिसांना सांगितले.
महाकुंभामुळे अभय सिंह चर्चेत
प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभ संपला, मात्र आयआयटी बाबा चर्चेत आहे. कधी ते आगळ्यावेगळ्या शैलीमुळे, तर कधी आरोपांमुळे चर्चेत असतात. अलीकडेच एका वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान अभय सिंहने मारहाणीचा आरोप केला होता. IIT बाबाने सांगितले होते की, 28 फेब्रुवारीला एका वृत्तवाहिनीने त्याला मुलाखतीसाठी बोलावले होते. यावेळी तिथे त्याच्याशी गैरवर्तन केले गेले. काही लोक न्यूज रुममध्ये शिरले अन् हाणामारी केली.
भारत-पाकिस्तान सामन्यामुळे ट्रोल
नुकताच चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत-पाकिस्तान सामना झाला. हा सामना भारताने जिंकला अन् त्यात विराट कोहलीचे 51 वे शतकही झाले. दरम्यान, या सामन्यात भारताचा पराभव होणार, असे भाकित आयआयटी बाबाने केले होते. पण, सामना जिंकल्यावर क्रिकेट चाहत्यांनी बाबाला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल केले.