'वारंवार खोटं बोलून इतिहास बदलणार नाही', राहुल गांधींचा भाजपच्या त्या' टीकेवर पलटवार...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2024 08:41 PM2024-04-10T20:41:46+5:302024-04-10T20:42:11+5:30

भाजपने काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लीम लीगची छाप असल्याची टीका केली.

'History will not changed by repeated lies', Rahul Gandhi's response to BJP's 'criticism | 'वारंवार खोटं बोलून इतिहास बदलणार नाही', राहुल गांधींचा भाजपच्या त्या' टीकेवर पलटवार...

'वारंवार खोटं बोलून इतिहास बदलणार नाही', राहुल गांधींचा भाजपच्या त्या' टीकेवर पलटवार...

Rahul Gandhi Attacks BJP: लोकसभा निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशा परिस्थितीत सत्ताधारी आणि विरोधकांच्या एकमेकांवरील टीका अधिक तीव्र झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, भाजपने काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लीम लीगची छाप असल्याची टीका केली होती. त्या टीकेला आता काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 

इतिहास साक्षीदार आहे...
राहुल गांधी यांनी बुधवारी ट्विटरवर पोस्ट करताना म्हटले की, कोण देशभक्त आहे आणि कोण देशद्रोही, याचा इतिहास साक्षी आहे. यंदाची निवडणूक ही दोन विचारसरणीतील लढाई आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लीम लीगची छाप दिसणाऱ्या भाजपने जाणून घेतले पाहिजे की, विविध राजकीय व्यासपीठांवर वारंवार खोटे बोलून इतिहास बदलला जाणार नाही. एका बाजूला भारताला कायम एकसंध ठेवणारी काँग्रेस आणि दुसऱ्या बाजूला लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणारी भाजप आहे. 

इंग्रजांच्या विरोधात कोण उभा राहिला
देशाची फाळणी करणाऱ्या शक्तींशी कोणी हातमिळवणी केली आणि देशाच्या एकात्मतेसाठी आणि स्वातंत्र्यासाठी कोण लढले, याचा इतिहास साक्षी आहे. भारत छोडो आंदोलनात इंग्रजांच्या विरोधात कोण उभे होते? जेव्हा देशभरातील तुरुंगे काँग्रेस नेत्यांनी भरले जात होते, तेव्हा देशाचे विभाजन करण्यासाठी राज्यांमध्ये चालणाऱ्या सरकारांना कोणत्या शक्तींनी प्रेरित केले? असा सवाल राहुल यांनी विचारला. 
 

Web Title: 'History will not changed by repeated lies', Rahul Gandhi's response to BJP's 'criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.