मोदींच्या डुबकीनंतर लक्षद्वीपसाठी खास प्लॅन, केंद्र सरकारनेही घेतलं मनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 03:50 PM2024-01-09T15:50:07+5:302024-01-09T15:52:04+5:30

मोदी सरकारनेही लक्षद्वीपच्या पर्यटन विकासाचं आणखी मनावर घेतलं आहे. 

After Narendra Modi's dive, the central government also took a special plan for Lakshadweep | मोदींच्या डुबकीनंतर लक्षद्वीपसाठी खास प्लॅन, केंद्र सरकारनेही घेतलं मनावर

मोदींच्या डुबकीनंतर लक्षद्वीपसाठी खास प्लॅन, केंद्र सरकारनेही घेतलं मनावर

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीप दौरा केला अन् लक्षद्वीपचं सौंदर्य जगभरात चर्चेचा विषय ठरलं. मोदींचे व्हिडिओ आणि फोटो तुफान व्हायरल झाले, असून जगभरात लक्षद्वीच्या पर्यटनाची चर्चा होत आहे. तर, मालदीवच्या समुद्रकिनाऱ्यासोबत लक्षद्वीपची तुलना होऊ लागली. त्यामुळे, मालदीवच्या काही नेत्यांनी भारताबद्दल वाद्रगस्त विधान केलं. त्यानंतर, भारतीय सेलिब्रिटींनी लक्षद्वीपच्या सौंदर्यांचं वर्णन मालद्वीवला भारताची ताकद दाखवून दिली. आता, केंद्रातील मोदी सरकारनेही लक्षद्वीपच्या पर्यटन विकासाचं आणखी मनावर घेतलं आहे. 

लक्षद्वीपच्या मिनिकॉय आयलँडवर (Minicoy Islands) नवीन एअरपोर्ट बनविण्याची योजना केंद्र सरकार आखत आहे. या विमानताळावरुन फायटर जेट्स, मिल्ट्री एयरक्राफ्ट व कमर्शियल विमानांचेही उड्डाण होणार आहे. त्यासोबतच, ड्युअल परपज एअरफिल्डही होणार आहे. मिनिकॉय आयलँडवर ड्युअल परपज एअरफिल्ड बनविण्यात येणार आहे. त्यामुळे, येथून फायटर जेटचे उड्डाण होईल. त्यासोबतच, सर्वसामान्य नागरिकांसाठी, प्रवाशांसाठीही विमान उतरणार आहे. 

सैन्य दलाच्या इतरही विमानांचे लँडींग आणि उड्डाण येथून होईल. यापूर्वी येथे केवळ सैन्य दलासाठीच एअरफिल्ड बनवण्याची योजना होती. मात्र, आता त्याला ड्युअर परपजसाठी एअरफिल्डच्या अनुषंगाने नवा प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे माहिती आहे. यासंदर्भात इंडिया टुडने वृत्त दिले आहे. येथे सैन्य दलाचे विमानतळ झाल्यास भारताची नजर अरबी समुद्र आणि हिंद महासागराच्या चारही बाजुंनी असणार आहे. तर, समुद्र लुटारूंच्या कारवायांना आळा बसणार आहे. 

लक्षद्वीपच्या कवरत्ती आयलँडवर भारतीय नौदलाच्या INS Dweeprakshak नौदलाचा बेस आहे. येथे भारतीय नौदल पहिल्यापासूनच मजबूत आहे. मात्र, आता वायूदलाच्या तयारीने भारताची या बेटावरील ताकद आणखी वाढणार आहे. आयएनएस द्वीपरक्षक दक्षिणी नौदल कमांडचा हिस्सा आहे. येथे २०१२ पासून ते कार्यान्वित. नौदल कवरत्ती द्वीप वर १९८० च्या दशकात संचालन करण्यात आले होते. येथे तेव्हापासून त्याची कायम फॅसिलिटी तैनात आहे. 

Web Title: After Narendra Modi's dive, the central government also took a special plan for Lakshadweep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.