हृदयद्रावक! मुलांचं आजारपण अन् आई-वडिलांचं नैराश्य; एकाच कुटुंबातील 4 जणांनी संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 14:01 IST2023-03-26T14:00:29+5:302023-03-26T14:01:05+5:30

तेलंगणातील हैदराबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

4 members of the same family ended their lives at the same time in Hyderabad, Telangana  | हृदयद्रावक! मुलांचं आजारपण अन् आई-वडिलांचं नैराश्य; एकाच कुटुंबातील 4 जणांनी संपवलं जीवन

हृदयद्रावक! मुलांचं आजारपण अन् आई-वडिलांचं नैराश्य; एकाच कुटुंबातील 4 जणांनी संपवलं जीवन

हैदराबाद : तेलंगणातीलहैदराबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हैदराबादच्या कुशाईगुडा भागात एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याने एकच खळबळ माजली. माहितीनुसार, कुटुंबातील चारही सदस्यांचे मृतदेह अपार्टमेंटमध्ये आढळून आले. एकाच कुटुंबातील चार जणांनी त्यांच्या अपार्टमेंटमध्ये विष प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

आई-वडील आणि दोन मुलांनी उचलले टोकाचे पाऊल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकाच कुटुंबातील 4 सदस्यांनी आत्महत्या केली असून यामध्ये आई, वडील आणि दोन मुलांचा समावेश आहे. सतीश, त्यांची पत्नी वेधा आणि त्यांची दोन मुले निशिकेश (9) आणि निहाल (5) अशी मृतांची नावे आहेत. विशेष बाब म्हणजे, ही घटना शुक्रवारी रात्री घडल्याचा संशय आहे, मात्र पोलिसांना शनिवारी दुपारी याची माहिती मिळाली. त्यानंतर सर्व मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले असल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितले. 

नैराश्यातून कुटुंबाने संपवले जीवन 
कुशाईगुडा भागात पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांनी विष प्राशन करून आत्महत्या केली, असे कुशाईगुडा पोलीस स्टेशनचे एसएचओ पी व्यंकटेश्वरलू यांनी सांगितले. प्राथमिक चौकशीत असे समोर आले आहे की, दोन्ही मुले आरोग्याच्या समस्येमुळे मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होते. उपचार करूनही मुले बरी होत नसल्याने आई-वडील निराश होते. याच नैराश्यातून कुटुंबाने आत्महत्या करून जीवन संपवले. खरं तर शुक्रवारी रात्री त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे, मात्र शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

  

Web Title: 4 members of the same family ended their lives at the same time in Hyderabad, Telangana