कॉँग्रेसच्या खोसकरांनी रोखली गावितांची विजयी घोडदौड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 12:35 AM2019-10-25T00:35:22+5:302019-10-25T00:36:00+5:30

इगतपुरी- त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेसच्या हिरामण खोसकर यांनी 31555 मतांची आघाडी घेत दहा वर्षे प्रतिनिधित्व केलेल्या विद्यमान आमदार व शिवसेनेच्या उमेदवार निर्मला गावित यांचा दारुण पराभव केला. प्रारंभी चौरंगी वाटणारी लढत प्रत्यक्षात दुरंगी झाल्याचे मतमोजणीनंतर स्पष्ट झाले.

 Khoskar of Congress won the rally by winning songs | कॉँग्रेसच्या खोसकरांनी रोखली गावितांची विजयी घोडदौड

कॉँग्रेसच्या खोसकरांनी रोखली गावितांची विजयी घोडदौड

Next

घोटी : इगतपुरी- त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात कॉँग्रेसच्या हिरामण खोसकर यांनी 31555 मतांची आघाडी घेत दहा वर्षे प्रतिनिधित्व केलेल्या विद्यमान आमदार व शिवसेनेच्या उमेदवार निर्मला गावित यांचा दारुण पराभव केला.
प्रारंभी चौरंगी वाटणारी लढत प्रत्यक्षात दुरंगी झाल्याचे मतमोजणीनंतर स्पष्ट झाले. काँग्रेस महाआघाडीचे हिरामण खोसकर यांना 86561 तर दहा वर्षे कॉँग्रेसकडून मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करुन यंदाची निवडणूक शिवसेनेकडून लढणाऱ्या निर्मला गावित यांना 55006 मते मिळाली. काँग्रेसमधून शिवसेनेत केलेले पक्षांतर, सेना- भाजप नेत्यांकडून अंतर्गत विरोधी काम यामुळे निर्मला गावित यांना पराभव पत्करावा लागला. विजयाचे क्षण येताच खोसकर यांच्या समर्थकांनी विजयाचा जल्लोष केला.
विद्यमान आमदार निर्मला गावित यांनी ऐनवेळी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी केली, त्यामुळे या मतदारसंघाच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष लागून होते. राष्ट्रवादी मधून इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश करून गोवर्धन गटाचे जिल्हा परिषद सदस्य हिरामण खोसकर यांनी उमेदवारी केली. प्रारंभी गावितांकडे एकतर्फी झुकणारी ही निवडणूक ऐन प्रचार काळात खोसकर यांनी चुरशीची केली. गुरुवारी नाशिकच्या कन्या विद्यालयात झालेल्या मतमोजणीत पहिल्या फेरीपासून शेवटपर्यंत खोसकर यांनी मतांची आघाडी घेऊन गावितांच्या विजयाची परंपरा खंडित केली.
विजयाची तीन कारणे...
1निर्मला गावित यांनी केलेल्या पक्षांतराचा निर्णायक फायदा घेण्यासाठी काँग्रेसने नेत्यांची फळी उभारुन महायुतीच्या विरोधात एकदिलाने काम केले.
2साधी राहणी, साधे व्यक्तिमत्व असे व्यक्तिमत्त्व असलेल्या खोसकरांना सामान्य नागरिकांची सहानुभूती मिळाली.
3गावित यांच्या घराणेशाहीमुळे मतदारसंघातील नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात आल्याचा प्रचार तसेच सर्वपक्षीय असंतुष्ट एकत्र आणले.
गावितांच्या पराभवाचे कारण...
ऐनवेळी पक्षांतर करण्याचा निर्णय, अति आत्मविश्वास अंगलट आला. शिवसेना-भाजप नेत्यांनी उचललेला पराभवाचा विडा, सर्वपक्षीय नेत्यांनी खोसकर यांच्या पाठीशी प्रबळ ताकद उभी केली. गावितांच्या मर्जीतील लोकांचा मनमानी कारभार, एकतर्फी नियोजन, एकचालकानुवर्ती प्रचार यंत्रणा ही पराभवाची महत्त्वाची कारणे.२
पराभूत उमेदवार पक्ष मिळालेली मते
१ निर्मला गावित (शिवसेना) 55006
२ योगेश शेवरे (मनसे) 6566
३ लकी ऊर्फ लक्ष्मण जाधव (वंचित ब. आ.) 9975
४ शिवराम खाणे (भा. ट्रा. पार्टी) 1461
५ दत्तात्रय नारळे (अपक्ष) 767
६ यशवंत पारधी (अपक्ष) 1278
७ विकास शेंगाळ (अपक्ष) 1110
८ शैला झोले (अपक्ष) २1506

Web Title:  Khoskar of Congress won the rally by winning songs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.