नांदगावी शौचालयात कोब्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 01:19 IST2021-02-20T20:10:57+5:302021-02-21T01:19:15+5:30

नांदगाव : सार्वजनिक शौचालयाचा वापर होत नसल्यामुळे तेथे सापाने आपले वास्तव्य निर्माण केल्याचे निदर्शनास आले आहे. हा प्रकार शहरापासून जवळच असलेल्या दहेगावच्या रस्त्यावर शनिवारी (दि.२०) दिसून आला.

Cobra in Nandgaon toilet | नांदगावी शौचालयात कोब्रा

नांदगावी शौचालयात कोब्रा

ठळक मुद्देपाच फुटाचा विषारी कोब्रा बाटलीबंद करून नंतर त्याला सुरक्षित जंगलात सोडून दिला.

नांदगाव : सार्वजनिक शौचालयाचा वापर होत नसल्यामुळे तेथे सापाने आपले वास्तव्य निर्माण केल्याचे निदर्शनास आले आहे. हा प्रकार शहरापासून जवळच असलेल्या दहेगावच्या रस्त्यावर शनिवारी (दि.२०) दिसून आला.
ग्रामपंचायतीने सार्वजनिक शौचालय बांधून ठेवले आहे, मात्र त्याला काटेरी कुपण लावून ठेवल्याने या बंद शौचालयात कोब्रा जातीच्या नागाने आश्रय घेतल्याचे सचिन बागुल यांना दिसले. त्यांनी नांदगावच्या सर्पमित्र पंकज शर्मा यांना कळविले, त्यांनी मोठ्या शिताफीने हा पाच फुटाचा विषारी कोब्रा बाटलीबंद करून नंतर त्याला सुरक्षित जंगलात सोडून दिला.

Web Title: Cobra in Nandgaon toilet