नागपूर महापालिकेत वंचित बहुजन आघाडी अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत? दोन्ही पक्षांमध्ये चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 13:24 IST2025-12-29T13:22:43+5:302025-12-29T13:24:44+5:30
Nagpur : नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत.

Vanchit Bahujan Aghadi with Ajit Pawar's NCP in Nagpur Municipal Corporation? Discussion between both parties
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) एकत्र येण्याच्या हालचाली सुरू आहेत. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आजवर दोन बैठका झाल्या असून या बैठकांमध्ये जागावाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला निश्चित करण्यात आला असल्याची माहिती आहे.
दोन्ही पक्षांमध्ये नागपूर शहरातील राजकीय परिस्थिती, सामाजिक समीकरणे आणि निवडणूक व्यवस्थापन यावर सविस्तर चर्चा झाली असून युतीच्या शक्यतेकडे सकारात्मक दृष्टीने पाहिले जात आहे.
स्थानिक नेतृत्वाला अधिकार
बैठकीदरम्यान प्रभागनिहाय ताकद, मतदारसंघीय गणित आणि समन्वयाची रूपरेषा यावरही विचारविनिमय करण्यात आला. राष्ट्रवादीचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी युतीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाला दिले आहेत. युतीसंदर्भात अंतिम निर्णय संबंधित पक्षांच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या बोलणीवर अपेक्षित आहे. लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.