राहुल गांधी, खरगे यांचा विदर्भात प्रचाराचा धडाका; राज्यातील पहिली सभा आज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2024 11:46 IST2024-04-13T11:45:19+5:302024-04-13T11:46:21+5:30

राज्यातील पहिली सभा आज साकोलीत

Rahul Gandhi, Kharge campaign blast in Vidarbha; First meeting in the state today | राहुल गांधी, खरगे यांचा विदर्भात प्रचाराचा धडाका; राज्यातील पहिली सभा आज

राहुल गांधी, खरगे यांचा विदर्भात प्रचाराचा धडाका; राज्यातील पहिली सभा आज

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : पूर्व विदर्भात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व नेते राहुल गांधी हे प्रचाराचा धडाका सुरू करणार आहेत. राहुल गांधी यांची शनिवारी साकोली येथे जाहीर सभा होत असून ही त्यांची राज्यात पहिली प्रचार सभा आहे. १४ एप्रिल रोजी खरगे यांची नागपुरात सभा होईल. प्रियंका गांधींच्या चंद्रपूर दौऱ्याबाबत अनिश्चितता कायम आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या साकोली या मतदारसंघातून राहुल गांधी हे राज्यातील प्रचाराचा शुभारंभ करीत आहेत. राहुल गांधी यांचे शनिवारी दुपारी ३.१५ वाजता विशेष विमानाने नागपुरात आगमन होईल. येथून ते हेलिकॉप्टरने साकोलासाठी रवाना होतील. दुपारी ४ वाजता आयोजित सभेत सहभागी होतील.

nचंद्रपूरच्या उमेदवार आ. प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारासाठी १५ एप्रिल रोजी प्रियंका गांधी यांची सभा होणार होती.
nमात्र, इतर ठिकाणी सभा असल्यामुळे चंद्रपूरची सभा रद्द करण्यात आली आहे. ही सभा १६ किंवा १७ एप्रिल रोजी आयोजित करण्याचे काँग्रेस नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

Web Title: Rahul Gandhi, Kharge campaign blast in Vidarbha; First meeting in the state today