Maharashtra Assembly Election 2019  : सुधाकर देशमुख यांचे शक्तिप्रदर्शन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 12:09 AM2019-10-20T00:09:38+5:302019-10-20T00:10:29+5:30

शनिवारी प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने पश्चिम नागपूरचे भाजपाचे उमेदवार सुधाकर देशमुख यांनी भव्य प्रचार रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

Maharashtra Assembly Election 2019:Sudhakar Deshmukh Shown the power | Maharashtra Assembly Election 2019  : सुधाकर देशमुख यांचे शक्तिप्रदर्शन 

Maharashtra Assembly Election 2019  : सुधाकर देशमुख यांचे शक्तिप्रदर्शन 

Next
ठळक मुद्देबाईक रॅलीद्वारे सांगता : नागरिकांना केले आवाहन

लोकमत  न्यूज  नेटवर्क 
नागपूर : शनिवारी प्रचाराचा अखेरचा दिवस असल्याने पश्चिम नागपूरचे भाजपाचे उमेदवार सुधाकर देशमुख यांनी भव्य प्रचार रॅली काढून जोरदार शक्तिप्रदर्शन केले. गेले १० दिवस पश्चिम नागपूरच्या गल्लोगल्लीत त्यांनी पदयात्रा, जनसंवाद सभा, बैठका घेऊन मतदारांशी संपर्क साधला. पण अखरेच्या दिवशी बाईक रॅली काढून संपूर्ण मतदार संघ पिंजून काढत मतदारांना भाजपाला साथ देण्याचे आवाहन केले.
फुटाळा परिसरातून देशमुख यांची बाईक रॅली निघाली. खुल्या जीपवर सुधाकर देशमुख भगवा फेटा घालून होते, सोबत पश्चिम नागपुरातील पदाधिकारी होते. ही रॅली वायुसेनानगर, हजारी पहाड, गंगानगर, फ्रेंड्स कॉलनी, गिट्टीखदान, बोरगाव, अवस्थीनगर, झिंगाबाई टाकळी, मानकापूर, छावणी, सदर, गड्डीगोदाम, बजेरिया, सीताबर्डी, रामदासपेठ, काचीपुरा, धरमपेठ, रामनगर, शंकरनगर परिसरातून गेली. रॅलीमध्ये मोठ्या संख्येने भाजपाचे कार्यकर्ते पक्षाचे चिन्ह, झेंडे घेऊन सहभागी झाले होते. रॅलीदरम्यान काही मुख्य चौकांमध्ये देशमुख यांचे स्वागतही करण्यात आले. दरम्यान सर्वांना हात जोडून ते आवाहन करीत होते. रॅलीत नगरसेवक संदीप जाधव, संजय बंगाले, मायाताई इवनाते, सुनील हिरणवार, सुनील अग्रवाल, प्रमोद कौरती, प्रगती पाटील, वर्षा ठाकरे, रूपा रॉय, शिल्पा धोटे, उज्ज्वला शर्मा, भूषण शिंगणे, अर्चना पाठक, कृतिका मसराम, संगीता गिºहे आदी सहभागी झाले होते. तसेच मंडळाचे अध्यक्ष किशन गावंडे, अभय दीक्षित, घनश्याम चौधरी, विनोद कन्हेरे, पप्पी वाजपेयी, रमेश चोपडे, नरेश बरडे, जयप्रकाश गुप्ता, रमेश गिरडे, सुनील अग्रवाल, अशोक डोर्लीकर, सुनील मिश्रा, कंचना करमरकर, सतीश डांगोर, रमेश गौर, डॉ. उमर खानसुद्धा संपूर्ण रॅलीत सहभागी होते.

Web Title: Maharashtra Assembly Election 2019:Sudhakar Deshmukh Shown the power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.