सौंदर्याने अनेकांना घायाळ करणाऱ्या अपूर्वा नेमळेकरची आई राहते प्रचंड साधी; पाहा मायलेकींचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 07:00 AM2022-05-05T07:00:00+5:302022-05-05T07:00:07+5:30

Apurva nemlekar: अपूर्वाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिची आई दिसत असून त्या प्रचंड साध्या असल्याचं पाहायला मिळतं.

marathi actress apurva nemlekar mother photo viral on social media | सौंदर्याने अनेकांना घायाळ करणाऱ्या अपूर्वा नेमळेकरची आई राहते प्रचंड साधी; पाहा मायलेकींचा फोटो

सौंदर्याने अनेकांना घायाळ करणाऱ्या अपूर्वा नेमळेकरची आई राहते प्रचंड साधी; पाहा मायलेकींचा फोटो

Next

शेवंता म्हणून प्रत्येक तरुणाला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या माध्यमातून अपूर्वाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळलील. या मालिकेमुळे ती रातोरात सुपरस्टार झाली. आज अपूर्वाचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळेच तीदेखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी दररोज तिच्याशी निगडीत काही ना काही अपडेट नेटकऱ्यांना देत असते. यावेळी तिने तिच्या आईचा फोटो शेअर केला आहे.

आपल्या आवडत्या कलाकाराच्या वैयक्तिक जीवनाविषयी जाणून घेण्यासाठी नेटकरी कायमच उत्सुक असतात. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात कोण आहे, ते काय करतात हे जाणून घ्यायचा प्रयत्न चाहते करतात. यामध्येच अपूर्वाने तिच्या आईसोबत एक फोटो शेअर करत छानशी पोस्ट लिहिली आहे.

दरम्यान, अपूर्वाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिची आई दिसत असून त्या प्रचंड साध्या असल्याचं पाहायला मिळतं. आपली लेक लोकप्रिय अभिनेत्री असतानाही त्यांच्यातील साधेपणा नेटकऱ्यांचं मन जिंकण्यास यशस्वी ठरत आहे. अपूर्वा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. रात्रीस खेळ चाले या मालिकेव्यतिरिक्त तिने अन्य काही लोकप्रिय मालिकांमध्येही काम केलं आहे.

Web Title: marathi actress apurva nemlekar mother photo viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app