'काही दिया परदेस'फेम अभिनेता झाला बाबा; पत्नीने दिला चिमुकल्या बाळाला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2022 04:51 PM2022-04-08T16:51:34+5:302022-04-08T16:55:25+5:30

Sameer khandekar: समीर हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

marathi actor sameer khandekar became father | 'काही दिया परदेस'फेम अभिनेता झाला बाबा; पत्नीने दिला चिमुकल्या बाळाला जन्म

'काही दिया परदेस'फेम अभिनेता झाला बाबा; पत्नीने दिला चिमुकल्या बाळाला जन्म

Next

सध्या कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी त्यांच्या जीवनातील आनंदाचे क्षण चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. काही दिवसांपूर्वीच मराठमोळी अभिनेत्री मृणाल दुसानीस आणि लाफ्टरक्वीन भारती सिंग या दोघी आई झाल्या. दोघींनीही त्यांच्या जीवनातील ही गुडन्यूज चाहत्यांसोबत शेअर केली. त्यांच्या नंतर आता मराठी कलाविश्वातील एक अभिनेता बाबा झाला आहे. अलिकडेच त्याच्या पत्नीने एका चिमुकल्या मुलीला जन्म दिला आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता समीर खांडेकर (sameer khandekar)  याच्या घरी चिमुकल्या पावलांचं आगमन झालं आहे. ६ एप्रिल रोजी समीरच्या पत्नीने वैभवीने एका मुलीला जन्म दिला. यावेळी समीरने एक सेल्फी काढत हा फोटो नेटकऱ्यांसोबत शेअर केला आहे.

"दिनांक : 6 एप्रिल 2022, वेळः सायंकाळी 5 वाजून 08 मिनीटं.आम्ही दोघं आणि “ती” निःशब्द…" असं कॅप्शन देत त्याने त्याच्या मुलीचा फोटो शेअर केला आहे. समीरने ही पोस्ट केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झाला.

दरम्यान, समीर हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. 'ती परत आलीये', 'काहे दिया परदेस', 'वैजू नं १' या मालिकांमध्ये तो झळकला आहे. तसंच त्याचे ‘आपली सोसल वाहिनी’ या सेगमेंट मधून अनेक मजेशीर व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. याचं दिग्दर्शन आणि लेखन स्वतः समीर खांडेकर याने केले असून त्याची पत्नी वैभवीने निर्माती म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. तसंच त्याने काही मराठी चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

Web Title: marathi actor sameer khandekar became father

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app