वीणा जामकरने पूर्ण केले 'ह्या' सिनेमाचे चित्रीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2018 06:57 PM2018-12-18T18:57:33+5:302018-12-18T18:58:55+5:30

अभिनेत्री वीणा जामकरने पुण्यातील भोरमध्ये चित्रीकरण करत असल्याची माहिती खुद्द तिने सोशल मीडियावर दिली होती.

Veena Jamkar completed filming of 'This' movie | वीणा जामकरने पूर्ण केले 'ह्या' सिनेमाचे चित्रीकरण

वीणा जामकरने पूर्ण केले 'ह्या' सिनेमाचे चित्रीकरण

googlenewsNext
ठळक मुद्देवीणा जामकर 'बाई' चित्रपटात दिसणार मुख्य भूमिकेत'बाई' चित्रपटाचे चित्रीकरण झाले पूर्ण

नाटक, चित्रपट व मालिका अशा तिन्ही माध्यमात आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण करणारी अभिनेत्री वीणा जामकरने पुण्यातील भोरमध्ये चित्रीकरण करत असल्याची माहिती खुद्द तिने सोशल मीडियावर दिली होती. आता या चित्रपटाचे चित्रीकरण तिने पूर्ण केल्याची माहिती नुकतीच सोशल मीडियावर दिली अाहे व त्याचबरोबर तिने या चित्रपटाचे शीर्षक देखील सोशल मीडियावर सांगितले आहे. 
वीणा जामकर भोरमध्ये मराठी चित्रपट 'बाई'चे चित्रीकरण करत होती. या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर तिने सेटवरील फोटो शेअर करून या चित्रपटाची माहिती दिली आहे. तिने लिहिले की, अतिशय सुंदर मांडणीचा, लेखक अरविंद जगताप आणि दिग्दर्शक तानाजी घाडगे यांचा आगामी मराठी चित्रपट 'बाई' याचे शूट परवा भोरमध्ये संपले. खूप दिवसांनी इतकी मजा आली. सर्वांचे आभार. 

याच सेटवरील तिने बरेच फोटो यापूर्वी शेअर केलेे होते. त्यातील एका फोटोत तिच्यासोबत मराठी व दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे दिसत आहेत. या फोटोसोबत विणाने पोस्टमध्ये लिहिले की, सयाजी शिंदे सरांसोबत काम करण्याचे अखेर माझे स्वप्न पूर्ण झाले. फक्त दोन सीन्स आणि आयुष्यभर पुरेल एवढे प्रशिक्षण मिळाले.  
'बाई' चित्रपटात वीणा सोबत सयाजी शिंदे, उपेंद्र लिमये, संजय खापरे, उषा नाईक हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 
वीणा जामकर गेल्या वर्षी लालबागची राणी या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली होती आणि या सिनेमातील तिच्या कामाचे सगळीकडून खूप कौतूक झाले होते.  वीणा जामकरने आजवर अनेक प्रकारच्या भूमिका साकरल्या आहेत. पण ती पहिल्यांदाच एक ऐतिहासिक भूमिका साकारताना दिसणार आहे. ती रमाई या चित्रपटात रमाबाई यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. 

Web Title: Veena Jamkar completed filming of 'This' movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.