आपला दमदार अभिनय आणि सोज्वळ सौंदर्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे वैदेही परशुरामी. अभिनयासह नृत्य कलेतही ती पारंगत आहे. वैदेही सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती रसिकांसोबत संवाद साधत असते. शिवाय स्वतःचे फोटो आणि विचारही सोशल मीडियावर शेअर करते. तिने शेअर केलेला एक फोटो सध्या रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर वैदेहीने नवी कार खरेदी केली आहे. सोशल मीडियावर तिने आपल्या नवी गाडीचा फोटो शेअर करत रथ-सारथी असं कॅप्शन दिलं आहे. वैदेहीचे चाहते तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करतायेत. 

वैदेहीने 'वेड लागी जीवा' या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. हिंदी चित्रपटसृष्टीचे शहेनशाह महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत ती 'वजीर' चित्रपटातही झळकली होती.'काशिनाथ घाणेकर'' चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून वैदेही परशुरामीने रसिकांची मनं जिंकली. काही महिन्यांपूर्वी रुपेरी पडद्यावर झळकलेल्या 'सिम्बा' चित्रपटात तिने रणवीर सिंहच्या बहिणीची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिकाही रसिकांना भावली होती.

सध्या वैदेही फिटनेस फ्रिक झाली आहे. इतकेच नाही तर तिने वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. वैदेही परशुरामने सोशल मीडियावर वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती क्रंच पंच एक्सरसाईज व प्लँक्स करताना दिसते आहे. या व्हिडिओसोबत तिने म्हटले की, 'दुसऱ्यापेक्षा चांगले दिसणे म्हणजे फिटनेस नव्हे. तुम्ही आहात त्यापेक्षा फिट राहण्यासाठी फिटनेसकडे लक्ष दिले पाहिजे. '

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Vaidehi parshurami purchase new car on gudi padwa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.