'अरे हम गरीब हुए तो क्या हुआ, दिल से हम अमीर है....', टाईमपास ३चा मुहूर्त पडला पार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2021 14:57 IST2021-02-16T14:57:13+5:302021-02-16T14:57:59+5:30
Timepass 3 Movie Muhurt : 'टाईमपास ३'च्या शूटिंगला झाली सुरूवात

'अरे हम गरीब हुए तो क्या हुआ, दिल से हम अमीर है....', टाईमपास ३चा मुहूर्त पडला पार
'अरे हम गरीब हुए तो क्या हुआ, दिल से हम अमीर है....' हा संवाद आठवतोय ना... दगडूची आठवण झाली ना. लवकरच हा दगडू पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक निर्माते रवी जाधव पुन्हा एकदा 'टाइमपास'चा तिसरा भाग प्रेक्षकांसाठी घेऊन येतो आहे. 'टाइमपास ३' असे या सिनेमाचे नाव असून त्यात एका नव्या चेहऱ्याची एन्ट्री होणार आहे. हा नवा चेहरा म्हणजे अभिनेत्री ऋता दुर्गुळे. आता या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पार पडला.
रवी जाधवने इंस्टाग्रामवर टाईमपास ३च्या मुहूर्ताचा फोटो शेअर करत लिहिले की, मोरया. आशीर्वाद असावा. नवीन सुरूवात. टाईमपास ३च्या शूटिंगबाबत खूप उत्सुक असल्याचे रवी जाधवने म्हटले आहे.
टाईमपास ३ चित्रपटात प्रथमेश परब, हृता दुर्गुळे, वैभव मांगले हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. टाईमपास ३च्या संवाद लेखनाची जबाबदारी अभिनेता-लेखक प्रियदर्शन जाधव याच्यावरच असल्याचे कळते आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अभिनेत्री ऋता दुर्गुळे आता टाईमपास ३ या चित्रपटात झळकणार आहे. ऋताने दुर्वा , फुलपाखरू यांसारख्या मालिकेत मुख्य भूमिका साकारली आहे. तसेच सिंगिग स्टार या रिॲलिटी शो मध्ये देखील ती झळकली होती. स्ट्रॉबेरी शेक सारखी एक वेगळी शॉर्ट फिल्म आणि दादा एक गुड न्यूज आहे या नाटकात देखील तिने काम केले आहे.
आगामी 'अनन्या' हा हृताचा पहिला सिनेमा आहे. आता आणखी एका सिनेमातून हृता मोठ्या पडद्यावर झळकणार आहे, म्हटल्यावर तिचे चाहते खूप खूश आहेत.