दुबईच्या आलिशान घरात सोनाली कुलकर्णीचा सुखी संसार सुरु, पहिल्यांदाच पाहा तिच्या घराची खास झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 14:22 IST2021-05-19T14:09:13+5:302021-05-19T14:22:56+5:30

अप्सरा फेम सोनाली कुलकर्णीच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची तिच्या चाहत्यांना उत्सुकता असते. विशेषतः घराबाबत प्रत्येक गोष्ट ऐकायला मिळावी किंवा त्याची माहिती मिळावी अशी रसिकांची इच्छा असते. त्यामुळे सोनालीचे खास व्हिडीओमुळे तिचे घर पाहण्याचीही चाहत्यांची इच्छा पूर्ण झाली.

Sonalee Kulkarni Dubai House Is So Lavish, You Will Certainly Say Amazing | दुबईच्या आलिशान घरात सोनाली कुलकर्णीचा सुखी संसार सुरु, पहिल्यांदाच पाहा तिच्या घराची खास झलक

दुबईच्या आलिशान घरात सोनाली कुलकर्णीचा सुखी संसार सुरु, पहिल्यांदाच पाहा तिच्या घराची खास झलक

कोरोना काळामुळे अनेकदा सेलिब्रेटींना त्यांच्या लग्नाच्या तारखा पुढे ढकलत अखेर कोरोनाच्या नियमांनुसार कमीत कमी पाहुण्याच्यांच्याच उपस्थितीतच लग्न उरकावे लागले आहे. लग्नाचा जास्त मोठा तामझाम न करता अतिशय साध्या पद्धतीने लग्न करत असल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांसह सेलिब्रिटीमंडळीसुद्धा रेशीमगाठीत अडकत आहेत. त्याचपाठोपाठ आता अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने देखील लग्न उरकले आहे. 


विशेष म्हणजे  ३३वा वाढदिवसाचे निमित्त साधत लग्नबंधनात अडकल्याचे जाहीर करत चाहत्यांना सुखद धक्काच दिला आहे. ७ मे रोजीच सोनालीने दुबईत कुणाल बेनोडेकरसोबत लग्न करत आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर  केले आहेत. या फोटोंवर चाहतेही शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

 

लॉकडाऊनमुळे लग्नाची तारिख पुढे ढकलावी लागली. या दोघांचे लग्न ठरल्याप्रमाणे युकेमध्ये होणार होते.पण कोरोनामुळे ते शक्य झाले नाही. अखेर दुबईच्याच मंदिरात चार लोकांच्या साक्षीने सोनाली बोहल्यावर चढली. सोनाली आणि कुणाल दोघांच्याही आई-वडिलांनी नवदाम्पत्याला ऑनलाईन पद्धतीने आशिर्वाद देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 

 

लग्नानंतर दुबईमध्ये सोनालीने तिच्या सुखी संसाराला सुरुवात केली आहे.पहिल्या लॉकडाऊनमध्ये सोनाली घरात वेगवेगळ्या गोष्टी करताना दिसली.अनेकदा व्हिडीओच्या माध्यमातून सोनाली कोरोनासदर्भात जनजागृती करताना दिसली, तर कधी किचनमध्ये पदार्थ बनवण्याची आवडही भागवताना दिसली.तर कधी याच घरात निवांत क्षणांचा आनंद घेताना पाहायला मिळाली.  तिचे हे सगळे व्हिडीओ तिने चाहत्यांसह शेअर केले होते. व्हिडीओ आणि फोटोंच्या माध्यमातून सोनालीच्या दुबईच्या घराचीही झलक चाहत्यांना पाहायला मिळाली. 

 

सोनालीच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची तिच्या चाहत्यांना उत्सुकता असते.  विशेषतः घराबाबत प्रत्येक गोष्ट ऐकायला मिळावी किंवा त्याची माहिती मिळावी अशी रसिकांची इच्छा असते. त्यामुळे सोनालीचे खास व्हिडीओमुळे तिचे घर पाहण्याचीही चाहत्यांची इच्छा पूर्ण झाली. अनेकदा चाहते तिच्या घराचे कौतुक करताना दिसले.

 

सोनालीचे दुबईचे घरही अतिशय आलीशान आहे.सोनालीने आजपर्यंत शेअर केलेल्या व्हिडीओ आणि फोटोंवरुन तुम्हालाही तिच्या या घराचा अंदाज येईल. कुणाचंही लक्ष आकर्षित करेल असेच सोनाली कुलकर्णीचे दुबईतले हे घर आहे. हे घर पाहून आपसुकच तुमच्या तोंडातून अतिसुंदर, अमेझिंग असे शब्द बाहेर पडले नाही तरच नवल.

Web Title: Sonalee Kulkarni Dubai House Is So Lavish, You Will Certainly Say Amazing