ही क्युट गर्ल आहे प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री; ओळखलंत का तुम्ही?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 12:01 PM2021-02-04T12:01:03+5:302021-02-04T12:01:35+5:30

बोलके डोळे, स्टाईल याची झलक या फोटोत स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. सोनालीनेच आईच्या वाढदिवशी शुभेच्छा देताना हा फोटो चाहत्यांसह शेअर केला होता.

Sonalee Kulkarni Childhood Photo Caught Everyone Attention Again | ही क्युट गर्ल आहे प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री; ओळखलंत का तुम्ही?

ही क्युट गर्ल आहे प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री; ओळखलंत का तुम्ही?

googlenewsNext

खरंतर चेह-यावरील हावभाव पाहून तुम्हालाही अंदाज आलाच असणार त्यामुळे ही चिमुरडी कोण हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मराठमोळी अभिनेत्री आणि रसिकांची लाडकी 'अप्सरा' म्हणजेच सोनाली कुलकर्णी.विविध सिनेमात सोनालीनं भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकली आहेत. सोनाली कुलकर्णीचा लहानपणीचा हा फोटो पाहताच अनेकांनी कमेंटस आणि लाईक्स करत पसंती दिली होती. 

चिमुकल्या सोनालीचा क्युटनेस तुम्हाला तिच्या प्रेमात पाडेल. चिमुकल्या  सोनालीच्या बालपणीच्या फोटोतील अदा या जणू अभिनेत्रीप्रमाणेच असल्याचे दिसते. बोलके डोळे, स्टाईल याची झलक या फोटोत स्पष्टपणे पाहायला मिळत आहे. सोनालीनेच आईच्या वाढदिवशी शुभेच्छा देताना हा फोटो चाहत्यांसह शेअर केला होता. 

कोणत्याही भूमिकेला न्याय देण्याचे कसब सोनाली  हिच्याकडे आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. नेहमीच तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो.सोनाली आपल्या लूक, स्टाइल आणि फॅशनाबाबत नेहमीच जास्त सजग असते.सोनाली कुलकर्णी हे नाव आज मराठी चित्रपटसृष्टीत आपले एक वेगळे अस्तित्वच निर्माण केले आहे. सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. सोशल मीडियावर सोनाली कुलकर्णी नेहमीच अॅक्टिव्ह असते. ती आपल्या फॅन्ससोबत नेहमीच वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. त्यामुळे लहानपणी ती कशी दिसत असणार हे पाहण्याचीही चाहत्यांची उत्सुकता असेल. मात्र या फोटोने चाहत्यांची ही देखील इच्छा पूर्ण झाली आहे. 

तसेच या वर्षी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीदेखील  कुणाल बेनोडेकरसह लग्नबेडीत अडकणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान आज सोनाली कुलकर्णीच्या साखरपुड्याला एक वर्ष पूर्ण झाला आहे. तिने नुकतेच सोशल मीडिया इंस्टाग्रामवर साखरपुड्याचे काही फोटो शेअर केले होते.

कुणाल बेनोडेकर दुबईमध्ये राहतो सोनालीने 2 फेब्रुवारी रोजी साखरपुडा केला होता. याबाबत आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोनालीने स्वतः फॅन्ससोबत ही आनंदाची बातमी शेअर केली होती. तिने आपल्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले होते. या फोटोंवरही तुफान शुभेच्छांचा वर्षाव झाला होता. तुर्तास साखरपुडा झाला असला तरी लग्नाची तारिख अजुन समोर आलेली नाही.


 

Web Title: Sonalee Kulkarni Childhood Photo Caught Everyone Attention Again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.