गोल्डन रंगाच्या साडीत खुललं सई ताम्हणकरचं सौंदर्य, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 06:05 PM2020-01-04T18:05:06+5:302020-01-04T18:05:24+5:30

सईचे गोल्डन रंगाच्या साडीतील फोटोशूटमधील फोटो समोर आले आहेत.

Sai Tamankar's beauty opens in golden saree, see her photo | गोल्डन रंगाच्या साडीत खुललं सई ताम्हणकरचं सौंदर्य, पहा तिचे फोटो

गोल्डन रंगाच्या साडीत खुललं सई ताम्हणकरचं सौंदर्य, पहा तिचे फोटो

googlenewsNext


आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई ताम्हणकर मराठी सिनेइंडस्ट्रीत ओळखली जाते. सई सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्ह असते. तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.तिच्या खाजगी आयुष्यात काय सुरू आहे, ती कुठे फिरतेय ही ती तिच्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत असते.

सईचे नुकतेच गोल्डन रंगाच्या साडीतील फोटोशूटचे समोर आले आहेत. यात तिने गोल्डन रंगाच्या साडीवर हिरव्या रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे. या साडीत ती खूपच सुंदर दिसते आहे.

अभिनेत्री सई ताम्हणकर ही आज मराठीतील आघाडीच्या अभिनेंत्रीपैकी एक आहे. तिने आजवर दुनियादारी, बालक पालक यांसारख्या अनेक चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. सईच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकताच तिचा धुरळा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

याशिवाय ती लवकरच लक्ष्मण उतेकर यांच्या मिमी सिनेमात दिसणार आहे. मराठीतल्या 'मला आई व्हायचंय' या चित्रपटावर आधारित हा चित्रपट आहे. या सिनेमात क्रिती सॅनन आणि पंकज त्रिपाठी यांच्याही मुख्य भूमिका आहे. लक्ष्मण उतेकर यांनी याआधी लुका छुपी सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. हा त्यांचा दुसरा हिंदी सिनेमा आहे.

सईने काही दिवसांपूर्वी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरुन सिनेमाचे शूटिंग सुरु करत असल्याची माहिती दिली होती.
 

Web Title: Sai Tamankar's beauty opens in golden saree, see her photo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.