ठळक मुद्देआदिनाथने पोस्ट केलेल्या फोटोत आपल्याला अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, व्ही.शांताराम, निवेदिता सराफ, निलिमा कोठारे, सुप्रिया पिळगांवकर, आदिनाथ कोठारे, उर्मिला कोठारे आणि आदिनाथची चिमुकली जीजा यांना पाहायला मिळत आहे.

आदिनाथ कोठारे, महेश कोठारे आणि सचिन पिळगांवकर यांना त्यांचे फॅन्स नेहमीच सोशल मीडियावर फॉलो करत असतात. त्यामुळे ते त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर नेहमीच काही ना काही फोटो, व्हिडिओ पोस्ट करत असतात. नुकताच या तिघांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केलेल्या काही फोटोंची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. महेश कोठारे यांनी शेअर केलेल्या फोटोत आपल्याला महेश कोठारे, अशोक सराफ आणि सचिन पिळगांवकर यांना पाहायला मिळत असून ही दोस्ती तुटायची नाय... असे कॅप्शन त्यांनी लिहिले आहे. 

आदिनाथने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोत आपल्याला मराठी चित्रपटसृष्टीत तीन दिग्गज अभिनेते एकत्र पाहायला मिळत आहेत. या दिग्गज अभिनेत्यांनी एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टी गाजवली होती. आदिनाथने पोस्ट केलेल्या फोटोत आपल्याला अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, व्ही.शांताराम, निवेदिता सराफ, निलिमा कोठारे, सुप्रिया पिळगांवकर, आदिनाथ कोठारे, उर्मिला कोठारे आणि आदिनाथची चिमुकली जीजा यांना पाहायला मिळत आहे.

आदिनाथने या फोटोसोबत नगमे हैं, शिकवे हैं, किस्से हैं, बाते हैं असे कॅप्शन लिहिले आहे. महेश कोठारे यांच्या अनेक चित्रपटांमध्ये आपल्याला अशोक सराफ यांना पाहायला मिळाले आहे तर निवेदिता या अनेक चित्रपटात महेश कोठारे यांच्या नायिका होत्या. ऐंशी-नव्वदीच्या दशकात महेश कोठारे, सचिन पिळगांवकर, अशोक सराफ, निवेदिता सराफ, सुप्रिया पिळगांवकर या कलाकारांनी एकाहून एक हिट चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. या सगळ्यांनी चित्रपटांमध्ये तर एकत्र काम केले आहे. पण खऱ्या आयुष्यातही या सगळ्यांचे एकमेकांसोबतचे संबंध खूपच चांगले आहेत. आजही इतक्या वर्षांनी देखील या सगळ्यांची मैत्री तशीच टिकून आहे हेच आपल्याला या फोटोमधून पाहायला मिळत आहे. 

आदिनाथच्या या फोटोमुळे मराठीतील या दिग्गज कलाकारांना पुन्हा एकदा एकत्र पाहायला मिळाले असल्याचा आनंद लोक प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त करत आहेत. आदिनाथच्या या फोटोला हजारोहून अधिक लाईक्स मिळाले असून या फोटोमुळे मराठीतील आमच्या सगळ्याच आवडत्या कलाकारांना आम्हाला एकत्र पाहायला मिळत आहे. केवळ आम्ही लक्ष्मीकांत बेर्डेंना मिस करत आहोत, त्यांनी खूपच लवकर या जगाचा निरोप घेतला अशा देखील कमेंट्स लोकांनी लिहिल्या आहेत. 

Web Title: Reunion of ashok saraf, sachin pilgaonkar and mahesh kothare but fans missed laxmikant berde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.